लोणी दि.१७ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-लोकनेते पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी महाविद्यालय, लोणी येथील कृषी विस्तार या विभागात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे प्रा.रमेश जाधव यांना भगवंत विद्यापीठ, अजमेर येथून कृषी विस्तार या विषयात पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.
प्रा. रमेश जाधव यांनी “महाराष्ट्रातील डाळिंब उत्पादकांचे डाळिंब पिकातील शिफारस केलेल्या लागवड तंत्रज्ञानाबद्दल ज्ञान आणि अवलंब ” या विषयावर संशोधन करून भगवंत विद्यापीठ, अजमेर येथे शोध निबंध सादर केला होता. विद्यापीठाच्या समितीने सदर शोधनिबंध मान्य करत प्रा. जाधव यांस पीएचडी पदवी प्रदान केली. प्रा. रमेश जाधव यांना कृषी विस्तार विभागातील डॉ. अमितकुमार मिश्रा यांचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून विशेष योगदान लाभले. प्रा. रमेश जाधव हे दुर्गापूर ता राहता येथील रहिवाशी असून प्रगतीशील शेतकरी माधव जाधव यांचे चिरंजीव तर आमदार राधाकृष्ण विखे पाटील ट्रक वाहतूक संस्थेचे उपाध्यक्ष सुनील जाधव यांचे बंधू आहेत.
.प्रा.रमेश जाधव यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व महसुल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्ह परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, खा.डॉ.सुजय विखे पाटील, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ, सहसचिव श्री.भारत घोगरे, कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयाच्या संचालिका डॉ.शुभांगी साळोखे, प्राचार्य डॉ.विशाल केदारी, डॉ.किरण गोंटे तसेच इतर शिक्षक वृंदानी अभिनंदन केले.



