लोणी( जनता आवाज वृत्तसेवा):- राहाता तालुक्यातील गोगलगाव शिवारातील लोणी ते तळेगाव जाणा-या रोडच्या गोर्डे पेट्रोल पंपापुढे असलेल्या सोमनाथ भाऊसाहेब मगर याच्या शेताच्या तरवडाच्या झाडाशेजारी रविवारी अज्ञात ( विठ्ठल नारायण भोर ) व्यक्तीचा मृतदेह आढळून आला, त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाला .
याविषयी लोणी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात साडेपाच वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
कोणत्यातरी हत्त्याराने ४६ वयाच्या अनोख्या व्यक्तीच्या छातीत हत्यार भोकसून खून केल्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .यामधील खरी हकिकत अशी की, कोणीतरी अज्ञात आरोपीने अज्ञात कारणासाठी अज्ञात (विठ्ठल नारायण भोर, अहमदनगर ) पुरुषाच्या छातीवर कोणत्यातरी हत्याराने भोकसून त्याचा खून केला असून सदर मयताचे प्रेत गोगलगाव शिवावर आढळून आला . सदर मयताचे वारसांचा शोध न लागल्यामुळे सरकारतर्फे भादवि कलम ३०२ अन्वये फिर्याद देण्यात आलेली आहे .




