वैजापूर ( जनता आवाज वृत्तसेवा ):तालुक्यातील दहेगाव येथील दादासाहेब पाटील कृषी महाविदयालयाच्या येथील कृषिदुत विद्यार्थ्यांनी तिडी येथे जनावरांचे लसिकरण शिबीर घेतले.
ग्रामिण कृषी जागृकता कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत ही शिबीर आयोजित करण्यात आले होते . महाविदयालयाचे प्राचार्य एस एस बैनाडे, उपप्राचार्य बी एम जोशी,कार्यक्रम अधिकारी प्रा ए आर पगार,विषय तज्ञ डॉ. व्हि एस घुमाळ, प्रा. एस व्ही मगर यांचे या शिबीरासाठी मार्गदर्शन लाभले.
या शिबिरात कृषिदुत प्रियंका खंडागळे , वैष्णवी कांबळे, बाविसकर, धनश्री डि, लिखिता बी,सुष्मिता ,बी समथा, ए सिंधू ,ए. वर्षिणी, धम्मू हारीका, बी. श्रीप्रसन्ना, डि.सृजनाया विद्यार्थीनी सहभाग घेतला. या शिबिरात १८ शेतकरी सहभागी झाले असून १०५ जनावरांना लम्पी या चर्म रोगाची लस देण्यात आली. पशुवर्धन पर्यवेक्षक डॉ. श्री. श्रीकांत रिठे यांच्या माध्यमातून लसीकरण केले.