वैजापूर( जनता आवाज वृत्तसेवा):-वैजापूर तालुक्यातील बिलोणी येथील मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्त ध्वजारोहण पार पडले. या प्रसंगी ग्रामपंचायत कार्यालय बिलोणीच्या वतीने शाळेसाठी पंधराव्या वित्त आयोगातील तरतुदीतून 75 इंच साइज असलेला एक लाख 60 हजार रुपये किंमतीचा इंटरॅक्टिव्ह बोर्ड शाळेला देण्यात आला.
त्यामुळे ही शाळा डिजिटल झाली. शिक्षकांनी एक ते सात वर्गात शैक्षणिक डिजिटल फ्लेक्स हे शैक्षणिक साहित्य भिंतीवर लावून सगळे वर्ग बोलके केले. मराठवाडा दिनाच्या निमित्ताने इंटर ऍक्टिव्ह बोर्ड तसेच डिजिटल वर्गाचे उद्घाटन गावच्या सरपंच गायत्री कदम यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवार यांनी केले. तर प्रास्ताविक अंकोळणेकर व आभार प्रदर्शन मुख्याध्यापक सामृत यांनी केले.
या कार्यक्रमास सोसायटीचे चेअरमन सुनील कदम, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्यामसिंग खंदारे ,अशोक हाडोळे, अशोक कदम, लक्ष्मण पवार ,जे.पी. कदम , यशवंत पवार , आसने , पालवे , सोमासे , काकडे , गीते आदींची उपस्थिती होती.