14.5 C
New York
Wednesday, October 22, 2025

Buy now

spot_img
spot_img

धनगर समाजाला आरक्षण भेटण्यासाठी उपोषण

राहुरी ( जनता आवाज वृत्तसेवा ):-चोंडी जिल्हा अहमदनगर या उपोषणाला तेरा दिवस पूर्ण होत आहेत सोबत आंदोलनाची साखळी निर्माण होत आहे. सदर घटनेला पाठिंबा देण्यासाठी मिरी या ठिकाणी राजूमामा तागड तर शेवगाव या ठिकाणी उद्या सकाळी धनगर समाज तहसीलदार कार्यालय शेवगाव या ठिकाणी मोर्चा नेत आहे.

मिरी तालुका पाथर्डी या ठिकाणी राजूमामा तागड मित्र मंडळ उपोषणाला बसले आहेत.धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करा तसेच विविध मागण्यासाठी सकल धनगर समाजाच्या वतीने या संदर्भात तहसीलदार पाथर्डी यांना निवेदन देण्यात आले २०१४ ला तुम्हाला आम्ही आरक्षण देऊ असं बारामती येथे धनगर बांधवांना विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी शब्द दिला होता.

मात्र सत्तेत आल्यानंतर फडणीस यांनी शब्द पाळला नसल्याने असे आरोप सकल धनगर समाजाने केला आहे. धनगर समाज काही राज्यांमध्ये एसटीमध्ये आहे तर काही राज्यांमध्ये नाही अशी पद्धत का सर्वांना समान का नाही असा प्रश्न उपस्थित झालेला आहे.धनगर समाजाला त्यांच्या हक्काचे एसटीमध्ये आरक्षण मिळावे यासाठी वेळोवेळी आंदोलने मोर्चे करावे लागले आहेत.प्रत्येक सरकार व राजकीय पक्ष धनगर समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे म्हणून जाहीर भूमिका घेतात परंतु फक्त इलेक्शन तोंडावर आल्यावर मात्र सत्तेत आल्यावर काहीच कृती करताना दिसून येत नाही. त्यामुळे धनगर समाजामध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.. त्यामुळे सकल धनगर समाजाच्या वतीने ज्येष्ठ नेते राजुमामा तागड व सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब कोळसे यांनी सरकारच्या विरोधात मिरी ता. पाथर्डी जि.अहमदनगर येथे बिरोबा मंदिर मिरी या ठिकाणी आमरण उपोषण करण्याचा इशारा सरकारला दिला आहे. जोपर्यंत सरकार धनगर समाजाला घटनेमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी एस टी मध्ये आरक्षण दिले आहे.परंतु आजही हा भोळा भाबडा समाज अरक्षणापासून वंचित आहे..जो पर्यंत एसटी मधे सामावून घेण्याचा आदेश काढत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नसल्याबाबतचे निवेदन.

माननीय तहसीलदार साहेब पाथर्डी यांना देण्यात आले आहे. राजू मामा तागड यांच्या कार्याला अनेक ठिकाणी कार्यकर्ते येऊन पाठिंबा दिलेला आहे. सदर घटनेला अनेक संघटनेचा पाठिंबा आहे.तसेच अनेक सामाजिक संघटनेवर पदाधिकारी असलेले बी.जे.पी. उत्तर विभाग राज्य उपाध्यक्ष पै.पानसरे सी बी यांनीही प्रत्यक्ष भेटून पाठिंबा दिला. तसे सदर घटनेची दखल न घेतल्यास मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे असे स्पष्ट सांगितले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!