11.1 C
New York
Friday, October 24, 2025

Buy now

spot_img
spot_img

हुमणी व पांढरीमाशी नियंत्रणासाठी ‘अशोक’ ने केली किडनाशकांची उपलब्धता- पुंजाहरी शिंदे

अशोकनगर( जनता आवाज वृत्तसेवा ):-  अशोक सहकारी साखर कारखाना कार्यक्षेञात हुमणी (उन्नी) किड व पांढरीमाशीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. त्यामुळे कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे यांचेसह संचालक मंडळाने हुमणी व पांढरीमाशी नियंत्रणासाठी इ.पी.एन.जैविक व इमिडा या औषधांची उपलब्धता केली असल्याची माहिती व्हा.चेअरमन पुंजाहरी शिंदे यांनी दिली.

यासंदर्भात माहिती देताना श्री.शिंदे यांनी सांगीतले की, अपुरा पाऊस यामुळे ऊस पिकावर हुमणी व पांढरीमाशीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. हि किडीची अळी जमिनीत वास्तव्य करते आणि पिकाच्या मुळ्यांवर उदरनिर्वाह करते. तर पांढरीमाशी ऊसाच्या पानावर बसल्याने पिवळी पडतात. यामुळे पिकाचे मोठे नुकसान होऊन उत्पादन घटते व आर्थिक नुकसान होते.

यासाठी व्यवस्थापनाने हुमणी व पांढरीमाशी नियंञणासाठी औषधे उपलब्ध केली आहेत. नियमाप्रमाणे रक्कम भरुन शेतकऱ्यांनी सदरची औषधे घेवून जावीत. औषधे खाञीशीर असून ८५ टक्केपर्यत हुमणी नियंञण होते. वापराबद्दल व अधिक माहितीसाठी ऊस विकास विभागाशी संपर्क करावा, असे श्री.शिंदे म्हणाले.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!