12.1 C
New York
Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img
spot_img

एक रुपया पीक विमा योजनेत जिल्ह्यातील ५लाख ९१ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी – महसूल मंत्री विखे पाटील पावसाने नुकसान झालेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना १५ कोटी रुपयांची मदत

श्रीरामपूर दि.३०( जनता आवाज वृत्तसेवा ):-राज्य सरकारने सुरू केलेल्या एक रुपया पीक विमा योजनेत जिल्ह्यातील ५लाख ९१ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून,पावसाने नूकसान झालेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना १५ कोटी रुपयांची मदत राज्य सरकारने देवून दिलासा दिला असल्याची माहीती महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

मंत्री विखे पाटील यांनी शासन आपल्या दारी उपक्रमाच्या माध्यमातून श्रीरामपूर शहर आणि तालुक्यातील नागरीकांच्या समस्या जाणून घेतल्या.निवेदनाद्वारे नागरीकांनी दिलेल्या प्रश्नाबबात त्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने सूचना देवून प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिले.
तसेच प्रधानमंत्री आवास योजना पथ विक्रेत्यांसाठी असलेल्या योजनेतील लाभार्थी व महीला बचत गटांना धनादेशाचे वितरण मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की नागरीकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी शासन आपल्या दारी उपक्रम संपूर्ण राज्यात सुरू आहे.नगर जिल्ह्य़ात प्रत्येक तालुक्यात जावून हे महाजनसंपर्क अभियान सुरू केले असून जिल्ह्याचा सर्वात मोठा कार्यक्रम शिर्डी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या माध्यामातून प्रत्येक व्यक्तीला योजनेचा लाभ मिळत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास या मंत्राने योजनांची यशस्वी अंमलबजावणी मागील नऊ वर्षात केली आहे.कोव्हीड संकट आपण सर्वानी अनुभवले.तेव्हापासून आज नागरीकांना मोफत धान्य मिळत आहे.घरकुल योजना आयुष्यमान भारत योजनेतून आरोग्य सुविधा नागरीकांना मिळत आहेत.आता राज्य सरकारने राज्यातील बारा कोटी नागरिकांना महात्मा फुले जन आरोग्य मोफत आरोग्य सेवा देण्याचा निर्णय घेतला.राज्यात शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजना सुरू केली आहे.शेतकऱ्यांवर कोणताही अर्थिक बोजा येवू न देता यायोजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून नगर जिल्ह्य़ात पाच लाख शेतकऱ्यांचा सहभाग या योजनेत नोंदला गेला असून,तालुक्यात पावसाने नूकसान झालेल्या शेती पीकांच्या भरपाई पोटी शेतकऱ्यांना १५ कोटी आणि गारपीटीत नूकसान झालेल्या शेतकऱ्यांना ५६ लाख रुपयांची मदत सरकारने दीली असल्याचे त्यांनी सांगितले.
जनतेच्या मनातील सरकार असल्याने सरकार कडून तसेच निर्णय होत आहे.या निर्णयाची अंमलबजावणी कशी होते हे जाणून घेण्यासाठी शासन आपल्या दारी उपक्रम असून,आमचे सरकार लोकांमध्ये जावून काम करणारे असल्याचा संदेश या माध्यमातून देत असल्याचे विखे पाटील म्हणाले.
मंत्री विखे पाटील यांनी आज हजारो नागरीकांचे अर्ज स्विकारले.शहरातील उत्सव मंगल कार्यालयात नागरीकांनी निवेदन देण्यासाठी मोठी गर्दी केली होती.प्रत्येक नागरीकांचा अर्ज स्विकारून प्रश्न समाजावून घेत त्यांनी अधिकाऱ्यांना प्रश्नाच्या सोडवणुकी  बाबत सूचना केल्या.
याप्रसंगी भाजपाचे तालुका अध्यक्ष दीपक पठारे संघटन सरचिटणीस नितीन दिनकर शहराचे अध्यक्ष मारुती बिंगले शरद नवले केतन खोरे संदीप चव्हाण रवि पाटील दता जाधव प्रांताधिकारी किरण सावंत यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!