कोपरगांव( जनता आवाज वृत्तसेवा):- कोपरगांव पिपल्स बँक स्टाफ गणेशोत्सव मंडळ व कोपरगांव पिपल्स को-ऑप बँक लि. आणि आनंदऋषीजी हॉस्पीटल अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कोपरगांव पिपल्स बँकेच्या विस्तारीत इमारतीमध्ये रक्तदान शिबीर पार पडले.
सदर रक्तदान शिबीरामध्ये बँकेचे सभासद, खातेदार, मा. संचालक व कर्मचारी वर्गानी सहभाग घेऊन रक्तदान केले. या प्रसंगी आनंदऋषीजी हॉस्पीटल अहमदनगर यांचे वतीने डॉक्टर सुनिलजी महानोर व त्यांची टिम उपस्थित होती. त्यांचा बँकेच्या वतीने व स्टाफ गणेशोत्सव मंडळा तर्फे बँकेचे चेअरमन व मा. संचालक मंडळ यांचे शुभहस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी बँकेचे चेअरमन श्री. कैलासचंदजी ठोळे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, स्वतः जवळचं काहीतरी दिल्याचं समाधान म्हणजे रक्तदान आहे. तरी त्यांनी उपस्थितांना रक्तदान करण्यासाठी व त्यांचे ओळखीच्या व्यक्तींना रक्तदान शिबीरात भाग घेण्याचे आवाहन केले
या प्रसंगी बँकेचे व्हा. चेअरमन श्री. भाऊसाहेब लोहकरे व मा. संचालक सर्व श्री. अतुल काले, राजेंद्र शिंगी, कल्पेश शहा, दिपक पांडे, सुनिल बंब, सत्येन मुंदडा, हेमंत बोरावके, सुनिल बोरा, संजय भोकरे, व संचालीका सौ. प्रतिभा शिलेदार, आणि बँकेचे असि जनरल मॅनेजर जितेंद्र छाजेड व अधिकारी वर्ग व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. रक्तदान शिबीर सांगता प्रसंगी आनंदऋषीजी हॉस्पीटल अहमदनगरचे डॉक्टर
श्री. सुनिलजी महानोर यांनी मनोगत व्यक्त करतांना आयोजीत केलेल्या रक्तदान शिबीराचे कौतुक केले व सांगितले की आपण राबिविलेल्या रक्तदान शिबीरामुळे व मिळालेल्या प्रतिसादामुळे कित्येक रुग्णांना जीवदान मिळणार आहे. रक्तदान शिबीर पुर्ण झाल्यानंतर मंडळाचे अध्यक्ष श्री. चंद्रशेखर व्यास यांनी उपस्थितांचे आभार मानले.




