लोणी दि.३०( जनता आवाज वृत्तसेवा ):-लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा रुरल कॉलेज ऑफ आर्किटेक्चर लोणी यांनी राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत घेतलेल्या आडगाव येथील हिवाळी शिबिरातील विविध सामाजिक कार्याची दखल लायन्स क्लब ऑफ श्रीरामपूर यांच्या ६१ व्या शपथविधी समारंभामध्ये घेवून विद्यालयास गौरवण्यात आले आहे. याचबरोबर कार्यक्रम अधिकारी प्रा. दीपिका आरबट्टी यांना देखील उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल गौरवण्यात आले.
प्रसंगी लायन्स क्लब श्रीरामपूरचे नूतन अध्यक्ष ला. जयकिशन मिलानी, सचिव ला. विशाल चोथानी खजिनदार ला. विजय शिंपी, ला. प्रवीण गुलाटी तसेच पुणे येथून आलेले लायन बी. एल. जोशी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हास्य योगा प्रशिक्षक व मोटिवेशनल स्पीकर श्रीमकरंद टिल्लू हे देखील उपस्थित होते. कार्यक्रमाचे शपथ प्रदान अधिकारी ला. बी एल जोशी यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. महाविद्यालयाच्या वतीने कार्यक्रम अधिकारी प्रा. दीपिका आरबट्टी यांनी हा सन्मान स्वीकारला.
हा सामाजिक उपक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले होतेतसेच या कार्यासाठी प्राचार्या तेजश्री ठाणगावकर यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
त्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील , संस्थेचे विश्वस्त माजी मंञी आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील, खा. डॉ सुजय विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे पाटील, मुख्य अतिरिक्त कार्यकारी अधिकारी डॉ शिवानंद हिरेमठ ,शिक्षण संचालिका सौ लिलावती सरोदे ,समन्व्यय प्रा.नंदकुमार दळे यांनी अभिनंदन केले आहे.




