7.8 C
New York
Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img
spot_img

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना २०२३ -२४ गळीत हंगामासाठी सज्ज मिल रोलर पूजन संपन्न

कोळपेवाडी ( जनता आवाज वृत्तसेवा ):- कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या २०२३-२४ या ६९ व्या गळीत हंगामाची तयारी करण्याच्या दृष्टीने मिल रोलर पूजन कारखान्याचे ज्येष्ठ संचालक व मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संचालक शिवाजीराव घुले यांच्या हस्ते सोमवार (दि.१८) रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

कारखान्याच्या ६८ व्या गळीत हंगामाची तयारी सुरु झाली आहे. कारखाना कार्यक्षेत्रात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असून परतीचा पाऊस यावर्षीची पावसाची सरासरी भरून काढेल अशी अपेक्षा आहे. कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून मागील वर्षीपासून नवीन बॉयलर व नवीन मिलवर मागील गळीत हंगाम यशस्वीरीत्या पूर्ण केला असून दुसऱ्या टप्यातील बॉयलिंग हाऊसचे काम देखील अंतिम टप्यात असून यावर्षीचा ६९ वा गळीत हंगाम पूर्णपणे नवीन यंत्र सामुग्रीच्या माध्यमातून घेतला जाणार आहे. त्यामुळे गळीत हंगामाची पूर्व तयारी म्हणून दरवर्षी करण्यात येणारे मिल रोलर पूजन सोमवार (दि.१८) रोजी हरितालिकेच्या मुहूर्तावर संपन्न झाले.

याप्रसंगी कारखान्याचे व्हा.चेअरमन डॉ. मच्छिंद्र बर्डे, संचालक दिलीपराव बोरनारे, सुधाकर रोहोम, सचिन चांदगुडे, सूर्यभान कोळपे, श्रीराम राजेभोसले, राहुल रोहमारे, अशोक मवाळ, सुनील मांजरे, मनोज जगझाप, वसंतराव आभाळे, शंकरराव चव्हाण, श्रावण आसने, गंगाधर औताडे, सुरेश जाधव, विष्णू शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय शिंदे, प्र.कार्यकारी संचालक सुनील कोल्हे, पद्मविभूषण डॉ. शरदचंद्र पवार पतसंस्थेचे चेअरमन देवेन रोहमारे , आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बाबा सय्यद, असि. सेक्रेटरी संतोष शिरसाठ, चीफ इंजिनिअर निवृत्ती गांगुर्डे, चीफ केमिस्ट सुर्यकांत ताकवणे, फायनान्स मॅनेजर सोमनाथ बोरनारे विविध खात्यांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!