लोणी दि.३०( जनता आवाज वृत्तसेवा ):- लोकनेते पदमभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थ्येच्या प्रवरा कन्या विद्या मंदीर लोणीच्या मुलींच्या १७ वर्ष वयोगटातील संघाने जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धेत अजिंक्य पद पटकावले अशी माहीती प्राचार्या भारती कुमकर यांनी दिली.
ध्रुव अकॅडमी संगमनेर या ठिकाणी १७ वर्ष वयोगटाच्या आतील मुलींच्या जिल्हास्तरीय फुटबॉल कप स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत सेमी फायनल करिता झालेल्या सामन्यामध्ये प्रवरा कन्या विद्या मंदीर लोणीच्या मुलींच्या संघाने ध्रुव अकॅडमी संगमनेर या यजमान संघाचा ८-० गोलने पराभव करून अंतिम स्पर्धेत बाजी मारली. अंतिम स्पर्धेमध्ये
आत्मा मलिक कोकमठाण येथील मुलींच्या संघाचाही ८-० ने दणदणीत पराभव करुन विजय संपादन करत प्रथम क्रमांक पटकावला . आणि विभागीय स्पर्धेसाठी या प्रवरा कन्या मंदिरच्या मुलींच्या संघाची निवड झाली. या स्पर्धेसाठी त्यांना क्रीडा शिक्षिका सौ. विद्या घोरपडे ,सौ. कल्पना कडू यांचे मार्गदर्शन मिळाले.
या मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल संघातील सर्व यशस्वी स्पर्धकांचे संस्थेचे अध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील , संस्थेचे विश्वस्त माजी मंञी आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील, खा. डॉ सुजय विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे पाटील, मुख्य अतिरिक्त कार्यकारी अधिकारी डॉ शिवानंद हिरेमठ ,शिक्षण संचालिका सौ लिलावती सरोदे ,समन्व्यय प्रा.नंदकुमार दळे,क्रिडा अधिकारी डाॅ.प्रमोद विखे यांनी अभिनंदन केले. तर विद्यालयाच्या प्राचार्या सौ भारती कुमकर , प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ सीमा बढे, क्रिडा शिक्षिका सौ विद्या घोरपडे ,सौ कल्पना कडू , शिक्षक श्री अनिल लोखंडे, श्री सुरेश गोडगे, सौ मोहिनी गायके ,श्री आर एम लबडे , आदी सर्वसह शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यीनींचे अभिनंदन करुन त्यांना पुढील विभागीय पातळीवर राज्य पातळीवर होणाऱ्या सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या.




