कोल्हार (जनता आवाज वृत्तसेवा ):- कोल्हार बु येथील संपदा शिक्षण संस्थेच्या गुरुकुल संपदा शाळेमध्ये विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना कर्तव्यप्रती शपथ प्रदान करण्यात आली.
कोल्हार येथील गुरुकुल संपदा मध्ये विद्यार्थी परिषदेची प्रक्रिया संपन्न
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हार चे मा. सरपंच सुरेंद्र पाटील खर्डे व कोल्हार चे उद्योजक श्री अजितशेठ कुंकलोळ, नमोह सायकल समूहाचे व्यवस्थापक सुरेशशेठ कुंकलोळ आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी विद्यार्थ्यांनी शाळेतील अभ्यासाबरोबरच इतर जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडाव्यात. केवळ अभ्यासच नाही इतर गुणांचा विकास होण्याच्या दृष्टीने लक्षपूर्वक शिक्षकाचे मार्गदर्शन घेतले पाहिजे. नेतृत्वगुणाची विद्यार्थ्यांनी कला अवगत केली पाहिजे. त्याचबरोबर शिक्षकांनी दिलेले कार्य प्रामाणिकपणे करत राहणे हे विद्यार्थ्याचे कर्तव्य असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये कुठल्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी ताकद तयार होते.
गुरुकुल संपदा मध्ये यावर्षी लोकशाही पद्धतीने विद्यार्थी परिषदेची निवड करण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांनी विद्यार्थी परिषदेच्या सदस्याची निवड करण्यासाठी गुप्त मतदान पद्धतीचा वापर केला. मतदान प्रक्रिये साठी मोबाईलचा यंत्रणा म्हणून वापर करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपल्याला आवश्यक असलेल्या प्रतिनिधीची निवड केली. मतदानातून निवडलेल्या विद्यार्थ्यांना आज शपथ ग्रहण समारंभा द्वारे सम्मानित करण्यात आले. याबरोबरच गुरुकुल संपदा मधील मुलांनी शालेय बँड ग्रुपने मनमोहक पद्धतीने सादरीकरण केले. या कार्यक्रमांमध्ये कोल्हार चे उद्योजक अजित शेठ कुंकलोळ यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमांमध्ये टी आय सायकल ऑफ इंडिया व नमोह सायकल ऑटो एजन्सी वतीने गरजवंत विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आली आहे. या कार्यक्रमावेळी मा. सरपंच ॲड . संपतराव खर्डे पाटील, आर. आर.खर्डे सर, टी आय सायकलचे कंपनी मॅनेजर याकूब फारुकी आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमा प्रमुख पाहुण्या समवेत इतर मान्यवर उपस्थित असलेले पालक वर्ग व ग्रामस्थ यांनी शालेय स्टाफ, विद्यार्थी, व गुरुकुल संपदा व्यवस्थापन समिती व प्राचार्य यांनी त्यांना लावलेली शिस्त व आपल्या संस्कृतीची दिलेली शिक्षण हे खूपच वाखण्याजोगे आहे असे गौरव उद्गार काढले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा गुगळे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे मार्गदर्शक गुरुकुल संपदा च्या संचालिका सौ. सारिका सुधीर आहेर यांनी केले. आभार प्रसंगी कार्यक्रम सूत्रसंचालन प्राचार्य सुधीर आहेर यांनी केले.
ग्रामीण शिक्षण असूनही कोल्हार येथील गुरुकुल संपदा या शिक्षण संस्थेमध्ये इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले जाते. परंतु या शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर शिस्त व आपली संस्कृतीचा आदर कसा करावा याचे मार्गदर्शन दिले जाते. या उपक्रमाबद्दल कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोल्हार चे मा. सरपंच श्री सुरेंद्र पाटील खर्डे यांनी गुरुकुल संपदा व त्यांच्या विद्यार्थी बद्दल त्यांचा गौरव करावा असे त्यांनी गौरव पूर्वक कौतुक करावे.



