माळवाडगाव ( जनता आवाज वृत्तसेवा ): –श्रीश्री इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रिकल्चरल सायन्सेस & टेक्नॉलॉजी ट्रस्ट बंगलोर , श्री श्री किसान मंच, कृषी विभाग ,आत्मा श्रीरामपुर यांच्या सयुक्त विद्यमानाने माळेवाडी येथे आयोजित तीन दिवसीय निवासी नैसर्गिक शेती शिबीर उत्साहात संपन्न झाले. समारोप समारंभ प्रसंगी श्री क्षेत्र सरला बेट चे मठाधीपती महंत रामगिरी महाराज यांनी प्रशिक्षण शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करताना म्हणाले की भारतीय संस्कृतीमध्ये ऋषी संस्कृती आणि कृषी संस्कृती या दोन संस्कृतीने फार महत्त्व आहे आरोग्याच्या शरीराच्या पोषण साठी कृषी संस्कृती तर मनाच्या स्थिरते साठी ऋषी संस्कृती फार उपयोगी आहे.
मनाला आध्यात्माशी जोडण्यासाठी ऋषी संस्कृती आहे.मन स्थिर झाले की चित्त समाधान मिळते नैसर्गिक शेती अभियानची. आज जागरूकतेची फार गरज आहे. नैसर्गिक शेती विषयी जागरूकता फार कमी आहे. आपणं सर्व शेतकरी बांधव प्रयत्नशील आहात खुप चांगल कार्य कौतुकास्पद आहे आपणाकडून घडतं आहे सर्व शेतकरी बांधवांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षक अशोक साबदे यांनी नैसर्गिक शेती करताना विवीध नॅचरल पद्धतीने तंत्रज्ञान वापरले जाते. बिजामृत , बीजसंस्कार , जीवामृत, जमिन जिवाणू समुद्ध करण्यासाठी तसेच पीक संरक्षणासाठी दशपर्णी अर्क, निमअर्क, आदी , योग्य व्यवस्थापन प्रशिक्षण शेतकरी बांधवांना दिले
यावेळी श्री श्री ऍग्री महाराष्ट्र राज्य संन्मवयक सुधीर चापते ,रचना चापते, डॉ.युगधरा बर्गे ऋषीकेश औताडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.या शिबिरा दरम्यान रचना दिदी फासाटे यांनी अग्निहोत्र महत्व प्रात्यक्षिक माहिती दिली या वेळी सुजाता दिदी शेडगे,जयंत चौधरी, ॲड. सुनिल गडाख ॲड श्रीकांत भणगे,आर्ट ऑफ लिविंगचे साधक, शेतकरी बांधव तसेच प्रक्षिणार्थीं, उपस्थित होते. या शिबिरासाठी सुनीता थोरात दिगंबर औताडे, रमेश लबडे रावसाहेब काळे, सुनील औताडे, आत्मा कृषी विभाग उपविभागीय कृषी अधिकारी अमोल काळे तालुका कृषी अधिकारीअविनाश चंदन, कृषी सहाय्यक मिनाक्षी बढे, अभिषेक मानकर याचे सहकार्य लाभले. श्री श्री किसान मंच चे किशोर अण्णा थोरात यांनी सर्वाचे आभार मानले.




