spot_img
spot_img

पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी कैलास तांबे, व्हा.चेअरमन पदी सतीष ससाणे यांची निवड

लोणी दि.२९ ( जनता आवाज वृत्तसेवा):-पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदावर कैलास तांबे आणि व्हा.चेअरमन पदी सतिष ससाणे यांची निवड करण्यात आली.

संचालक मंडळाची बैठक महसूल तथा पालक मंत्री मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हा बॅकेचे संचालक अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.सर्व संचालकासह सहकार विभागाचे मिंलींद भालेराव आणि गणेश पुरी उपस्थित होते.
संचालक कैलास तांबे यांच्या नावाची सूचना संचालक भानूदास तांबे यांनी मांडली त्यास संचालक शांताराम जोरी यांनी अनुमोदन दिले.व्हा चेअरमन पदाकरीता सतिष ससाणे यांच्या नावाची सूचना स्वप्निल निबे यांनी मांडली त्यास संचालक साहेबराव म्हस्के यांनी अनुमोदन दिले.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी नूतन पदाधिकार्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
चेअरमन कैलास तांबे आणि व्हा.चेअरमन सतिष ससाणे यांचे खा.डॉ सुजय विखे पाटील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनी विखे पाटील प्रवरा सहकारी बॅंकेचे चेअरमन डॉ भास्करराव खर्डे पाटील व्हा.चेअरमन मच्छिंद्र थेटे पाटील ट्रक्स वाहतूक सोसायटीचे चेअरमन नंदूशेठ राठी यांनी अभिनंदन केले आहे.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!