लोणी दि.२९ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-शेती क्षेञात केंद्र सरकारच्या धोरणातून होत असलेल्या बदलामुळे उत्पादन, मार्केटींग आणि प्रक्रिया या सुविधामुळे फ्लोरी कल्चर मिशनद्वारे फुल शेती चालना मिळत असून शेती क्षेत्रातही टाकाऊ पासून टिकाऊ या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून फुल शेतीला शाश्वता येत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय वनस्पती अनुसंधान लखनौचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विजय वाघ यांनी केले.
जनसेवा फौंडेशन, लोणी,
सी. एस. आय. आर. लखनौ आणि एन.बी.आर आय यांच्यावतीने आयोजित फुल शेती लागवड तंत्रज्ञान कार्यशाळेत डॉ. विजय वाघ बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील,राहाता कृषि उपन्न बाजार समिचे संचालक ज्ञानदेव चौधरी,लोणीच्या सरपंच कल्पना मैड,जनसेवा फौंडेशनच्या प्रकल्प संचालिका रुपाली लोंढे आदीसह अस्तगांव,तिसगांव,नांदुर्खी आणि लोणी परिसरांतील फुलशेती उत्पादक उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनात डॉ. वाघ म्हणाले फ्लोरी कल्चर मिशन द्वारे २१ राज्यात फुलशेती लागवडीला प्राधान्य दिले जात आहे. देशातील विविध संस्थाच्या माध्यमातून हे काम शेतक-यापर्यत पोहचवित असतांना नवीन प्रजाती, उत्पादकता वाढ, टिकाऊ क्षमता वाढ आणि टाकाऊ पासून टिकाऊ या तंत्राचा उपयोग केला जातो. मार्केटींग बरोबरचं प्रक्रिया उद्योगाला ही चालना देण्याचा प्रयत्न यातून होत आहे. झेंडू, शेवंती, निशीगंध, गुलाब याबरोबरचं पारंपारीक फुलांवरही संशोधन करून फुल शेतीला शाश्वत केले जात आहे. प्रात्याक्षिकावर भर देतानाच हर्बल उत्पादन प्रक्रियेला चालना दिली जात आहे. फ्लोरी कल्चर मिशनद्वारे रोजगार निर्मीती बरोबरचं शेतक-यांना फुल शेतीचे परिपूर्ण ज्ञान दिले जाते. यामध्ये शेतक-यांनी सहभागी व्हावे असेही सांगून मागील तीन वर्षात जनसेवा फौंडेशनने या प्रकल्पातून चांगले काम केल्याने पुन्हा तीन वर्ष हा प्रकल्प सुरु असणार आहे.
आपल्या मार्गदर्शनात सौ.शालीनीताई विखे पाटील म्हणाल्या, केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे शेतक-याच्या पाठीशी राहील्याने शेतकरीभिमुख निर्णय होत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या सर्व समावेशक शेती धोरणामुळे आज सेंद्रीय शेती,बांबू मिशन,फळबाग लागवड यासारख्या योजनांमुळे शेतीला चालना मिळत आहे. फुलशेतीतून चांगले उत्पादन घेऊन आपली यशोगाथा निर्माण करा असेही सौ.विखे पाटील म्हणाल्या.यावेळी एक लाख झेंडू आणि वीस लाख शेवंती रोपांचे वितरण लाभर्थींना करण्यात आले.
महसूल मंञी ना.राधाकृष्ण विखे पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा फौडेशन,लोणी अंतर्गत फुल प्रक्रिया उद्योग,फुल शेती आणि सुंगधी औषधी वनस्पती लागवड याविषयी मार्गदर्शन होत असल्याने नावीन्य पुर्ण शेतीला प्राधाने मिळून रोजगार निर्मीती ही होत आहे लखनौ आणि लोणी-प्रवरा हे लॅब टू लॅन्ड चे माॅडेल बनत आहे.यामुळे शेतक-यांनाही फायदा होत आहे.असे ज्ञानदेव चौधरी यांनी सांगिलले.



