राहाता( जनता आवाज वृत्तसेवा ):-गणेशोत्सव व ईद सणाच्या पार्श्वभूमीवर राहाता सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांचे नेतृत्व मार्गदर्शनाखाली राहाता शहरात पोलीसांनी पथसंचलन केले दंगल नियंत्रण पथकासोबत दंगा काबू योजना राबवली आहे गणेशोत्सव व इद सणाच्या पार्श्वभूमीवर राहाता शहरात शांतता तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता पोलिसांनी राहाता शहरातील मिरवणूक मार्ग तसेच चितळी रोड चौक वीरभद्र मंदिर शहरातील वेस सराफ बाजार गल्ली तसेच गणपती बाप्पा विसर्जन मिरवणूक मार्गावरून पोलिसांनी पथसंंचलन केले.
.या पथसंंचलना मध्ये दंगल नियंत्रण पथकातील पोलीस तसेच गृहरक्षक दलाचे जवान आणि राहाता पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ तसेच पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी सहाय्यक फौजदार बाबा सांगळे हेड कॉन्स्टेबल दीपक कदम यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी सहभागी होते
पोलिसांनी राहाता शहरात केलेल्या पथ संंचालना मुळे राहता शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी मदत होणार आहे पोलिसांनी पथ संंचालन करून मिरवणूक मार्गाचा आढावा घेतल्याने गणेशोत्सव मंडळ व नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे



