लोणी दि.२९( जनता आवाज वृत्तसेवा):- लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेतील प्लेसमेंट विभागाने केलेल्या यशस्वी पाठपुराव्यामुळे मागील पाच वर्षात विविध विद्या शाखांमधून पदवी प्राप्त केलेल्या १५ हजार १९३ विद्यार्थ्याची नामवंत कंपन्यामध्ये निवड झाली आहे.गुणवतापूर्ण शिक्षणा बरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या संधी संस्थेने मिळवून देण्याचे प्रयत्नही यशस्वी केले आहेत.
पाच वर्षात प्रवरेच्या १५ हजार १९३ विद्यार्थ्याची नामवंत कंपन्यामध्ये निवड
मंत्री तथा संस्थेचे चेअरमन ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने स्वतंत्र प्लेसमेंट विभाग सुरू केला असून.या विभागाच्या माध्यमातून देश विदेशातील नामवंत कंपन्यांच्या माध्यामातून विद्यार्थ्यांना नौकरीच्या संधी निर्माण करून दिल्या आहेत.मागील पाच वर्षापासून प्लेसमेंट विभागाने प्रत्येक महाविद्यालया स्तरावर कंपन्यांना निमंत्रित करून पदवी आणि पद्युतर विद्यार्थ्याना मुलाखतीच्या संधी निर्माण करून दिल्याने ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांना शहरी भागात संधी मिळाल्या आहेत.
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अभियांत्रिकी डिप्लोमा फार्मसी कृषी एमबीए महाविद्यालयाचे विस्तीर्ण असे कार्यक्षेत्र आहे. असंख्य विद्यार्थी यशस्वी होवून बाहेर पडतात.परंतू नोकरीचा निर्माण होणारा प्रश्न सोडविण्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेत स्वतंत्र प्लेसमेट विभाग सुरू करण्यात आला.या माध्यमातून सर्व विद्याशाखां मधील विद्यार्थ्यांना मोठा लाभ झाला.प्लेसमेंट विभागाने देश विदेशातील नामवंत कंपन्यांशी संपर्क साधून या कंपन्यांना थेट महाविद्यालयाच्या कॅमप्स मध्ये बोलावून विद्यार्थ्यांना मुलाखतीच्या संधी सातत्याने निर्माण करून दिल्या जात
आहेत.मुलाखतीला सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक मार्गदर्शन केले जात असल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढत असल्याचे दिसून आले आहे.
या निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक आणि अतांत्रिक आशा दोन्ही विभागातील विद्यार्थ्यांचा समावेश असून इन्फोसिस टिसीएस विप्रो केएसबी पंप सिप्ला फोन पे तसेच अतांत्रिक विद्यार्थ्यांना इंडीगो एअरलाइन्स टाटा मोटर्स एडीएफसी बॅक आशा मोठ्या कंपन्यामधून विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी थेट उपलब्ध झाल्याने अतिशय उत्साहाने सर्व विद्यार्थी शहराकडे नोकरीसाठी गेले आहेत.
विशेष म्हणजे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचा शैक्षणिक आलेख हा सात्तत्याने उंचावलेला आहे.त्यामुळे या कंपन्या अतिशय हक्काने आता संस्थेच्या विविध शाखांमध्ये येवून विद्यार्थ्यांची निवड प्रक्रीया करतात.या विद्यार्थ्यांना कौशल्य शिक्षणाबरोबरच औद्योगिक क्षेत्रात आवश्यक असलेल्या गोष्टीचे ज्ञान देण्यावर महाविद्यालयांनी लक्ष केंद्रित केले आहे.विशेष बाब म्हणजे एक हजाराहून अधिक कंपन्या समवेत झालेला करार कंपन्यांचा संस्थेकडे असलेला डेटा प्रवरेच्या प्लेसमेट विभागाचे वैशिष्ट्य ठरले आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये काम करण्याची असलेली जिद्द
ही कंपन्यांच्या दृष्टीने खूप प्राधान्याची बाब ठरली आहे.
त्यामुळेच ग्रामीण विद्यार्थ्यांची होणारी निवड याचे प्रमाण वाढले आहे.मंत्री
राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुलाखतीला जाण्यासाठी विद्यार्थ्यांना संस्थेच्या बस मोफत उपलब्ध करून देत असतात.
वाढती स्पर्धा लक्षात घेवून संस्थेतून शिक्षण घेणारा विद्यार्थी कुठेही मागे राहू नये तसेच त्याला नौकरीची संधी कशी मिळेल असा प्रयत्न गेली अनेक वर्ष यशस्वीपणे संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे.या प्रयत्नांना विविध देशात यशस्वीपणे कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांची साथ मिळाली.आज कंपन्या स्वता होवून संस्थेकडे येतात ही बाब खूप महत्त्वाची ठरली असल्याचे चेअरमन राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.



