7.3 C
New York
Monday, November 25, 2024

Buy now

spot_img
spot_img

कोल्हारमध्ये आनंदाचा शिधा वाटप सुरू ऑनलाईनचा खोडा : रेशन दुकानावर गर्दी

कोल्हार( जनता आवाज वृत्तसेवा ) :सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत शासनाकडून गणेश चतुर्थी निमित्त देण्यात येणारा आनंदाचा शिधा वाटप काल सोमवारी सुरू झाला. मात्र ऑनलाईन प्रक्रियेच्या अडचणीमुळे वेळ लागत असल्याने गरजवंत रांगेत ताटकळत आहेत. यामध्ये सुमारे ३ हजार पेक्षा अधिक पात्र शिधा धारक नागरिकांना वाटप होणार आहे.

केंद्र आणि राज्य सरकारचा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी आनंदाचा दिवाळी शिधा घोषने पासून राजकीय टीकेचा विषय बनला. मात्र कोरोना नंतर अडचणीत सापडलेल्या गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी यासाठी सरकारने सकारात्मक पाऊल उचलले. राहता तालुक्यातील कोल्हार-भगवतीपुर मध्ये अवघ्या शंभर रुपयात तेल, गरा, साखर अन हरभरा डाळ अशी पिशवीच्या किटचे वाटप झाले होते.

आता पुन्हा सर्वसामान्य जनतेस आधार देत गणेश चतुर्थी निमित्त शासनाने पुन्हा एकदा गोर गरिबांसाठी आनंदाचा शिधा देण्यात येणार असल्याचे जाहीर केले अन आता त्याचे वाटपही सुरू झाले आहे. यामध्ये १०० रुपयांत चनाडाळ, रवा, साखर प्रत्येकी एक किलो तर एक लिटर खाद्यतेल मिळणार आहे. कोल्हार मधील रेशन दुकानात आनंदाचा शिधा वाटप सुरू होताच दुकानावर झुंबड उडाली. मात्र सरकारने ऑनलाईन वाटप करण्याचे आदेश दिल्याने ग्रामीण भागात नवीन समस्या उभी राहिली आहे. मशीनवर ऑनलाईन प्रक्रिया नेटवर्किंगच्या अडचणीमुळे संथ गतीने होत आहे. कोल्हार बुद्रुक सोसायटीचे रेशन दुकान, भावतीमता सोसायटी तसेच अंभोरे व कसबे यांच्या खासगी दुकानाबाहेर शिधा घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागत आहेत.

संथ ऑनलाईन प्रक्रियेमूळे उशीर…!

अनिल बी निबे ( रेशन दुकान विक्रेते )

 

गोर-गरिबांना लवकरात लवकर आनंदाचा शिधा मिळावा अशी आमची इच्छा आहे. मात्र मशीनवर ऑनलाईन प्रक्रिया संथपणे होत असल्याने अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे पात्र शिधा धारकांना खूप वेळ ताटकळत उभे रहावे लागत असल्याने आम्हास वेदना होत आहेत. परंतु ऑनलाईन प्रक्रिया लवकरच वेगाने होण्यासाठी आम्ही पुरवठा विभागाच्या वरिष्ठांना कळविणार आहोत.

 

 

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!