लोणी दि.२१( जनता आवाज वृत्तसेवा ):-प्रवरेच्या माध्यमातून शिक्षणांसोबतचं खेळाकडे विशेष लक्ष दिले जाते.यामुळे क्रिडा क्षेञातही प्रवरा अव्वल स्थानावर आहे.प्रवरेत होत असलेल्या सास्कृतिक महोत्सव आणि क्रिडा महोत्सव हा विद्यार्थ्यासह सर्वासाठी पर्वणी ठरत आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील यांनी केले.
अहमदनगर क्रीडा कार्यालय अंतर्गत, राहाता तालुका क्रीडा समिती आणि प्रवरा माध्यमिक विद्यालय आडगाव बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राहाता तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी सौ.शालिनीताई विखे पाटील बोलत होत्या.यावेळी जिल्हा क्रीडा कार्यालयाचे भाऊराव विर,लोकनेते पद्यभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या शिक्षण संचालिका सौ.लिलावती सरोदे, संस्थेचे क्रिडा संचालक डाॅ.प्रमोद विखे, राहाता तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राहुल धावणे , स्थानिक स्कुल कमिटीचे अध्यक्ष कोंडिराम शेळके, ,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भिमराज शेळके,माजी मुख्याध्यापक मुस्ताक शेख , डॉ बाळासाहेब आंधळे , आडगावचे सरपंच व सर्व सदस्य तसेच वि वि सोसायटी चे चेअरमन,व्हा चेअरमन व सर्व सदस्य तसेच सर्व ग्रामस्थ व विविध विद्यालयातून आलेले खेळाडू व त्यांचे प्रशिक्षक उपस्थित होते. एकुण ४२ संघानी सहभाग नोंदविला.
या वेळी स्पर्धेचे तांत्रिक विभाग प्रमुख म्हणून प्रतिक दळे काम बघितले. यावेळी कोहकडे , सुनिल चोळके, सुनिल गागरे, किरण कडसकर, दुशिंग, दादा तुपे , गोडगे , शेंडगे, झोले , झडे ,श्री घोरपडे,सौ. राऊत ,सौ राठोड आदि उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री सिनारे केले तर आभार श्री सुनिल आहेर मानले.