शिर्डी (जनता आवाज वृत्तसेवा ):- शिर्डी जवळच असणारे सावळीविहीर येथील तिहेरी हत्याकांडातील आरोपी यांना पाच तासांत अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद.
हकीकत अशी की, शिडी येथील सावळीविहीर येथे दिनांक २०/०९/२०२३ रोजी रात्री ११/०० वाजेदरम्यान जावई सुरेश उर्फ बाळू विलास निकम व त्याचा चुलत भाऊ रोशन कैलास निकम दोघे रा. संगमनेर यांनी कौटुबीक वादातून दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरून पत्नी सौ वर्षा सुरेश निकम, मेव्हणा-रोहीत चांगदेव गायकवाड आणि आनी सासु हिराबाई भृपद गायकवाड अशा तिघांची धारदार चाकूने वार करुन निर्घुण हत्या केली तसेच सासु सौ संगिता चांगदेव गायकवाड सासरे चांगदेव गायकवाड आणि फिर्यादी सेव्हन सी योगिता महेंद्र जाधव अशांवर चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करून आरोपीनी पलायन केले.असल्या बाबत मिळालेल्या खबरी वरुन शिर्डी पोलीस स्टेशन गु.र.नं ८६४ / २०२३ भादवि कलम ३०२,३०७,५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
सदर गुन्हयाचे गांभीर्य ओळखून मा. पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सो यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर व शिर्डी पोलीस स्टेशनचे असे चार पथके आरोपीचा शोध घेणे कामी रवाना करणे बाबत दिलेल्या आदेशान्वये पो.नि/ श्री दिनेश आहेर सो यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथके तयार करून तात्काळ आरोपींचे शोधार्थ रवाना केले. पथक सदर गुन्हयातील आरोपीचा गोपनिय माहीती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेत असतांना आरोपी नाशिक येथे असल्याची माहीती प्राप्त झाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे। पथकातील पो.उप.निरीक्षक तुषार थाकराव, पोना विशाल दळवी, पोना संदीप चव्हाण, पोना/ रविंद्र कडले. पोना प्रशांत राठोड, पोकी जालींदर माने, चालक पोहेकॉ संभाजी कोतकर, चालक पोहेका अर्जुन बढे तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संदीप मिटके सो शिर्डी विभाग आणि त्याचे पथकातील पोहेको चोरमिसे, पोना दिनेश कांबळे अशांनी तात्काळ नाशिक येथे जाऊन नाशिक रोड पोलीस स्टेशनचे सपोनि गणेश शेळके, पोसई रामदास विंचु, पोना/ घेगडमल, पोना पवार, पोकी जाधव, कासार, चत्तर व लोणारे यांची मदत घेऊन तिहेरी हत्याकांडातील आरोपी सुरेश उर्फ बाळू विलास निकम व रोशन कैलास निकम याचा शोध घेतला असता ते मिळुन आल्याने त्यांना पदकाने मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामी शिर्डी पोलीस स्टेशनला हजर केले आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला सो. पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्रीमती स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपुर, मा. श्री. संदीप मिटके साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी च अंमलदार यांनी केलेली आहे.