लोणी दि.२१ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-महाराष्ट्राची लोकधारा.. लेक वाचवा.. शेतकरी व्यथा.. स्वच्छ भारत.. या नाटीका सह जांभुळ पिकल्या झाडाखाली.. वह कृष्णा है…देवान काळजी रे . इमुका वाली पोरं.. अशा विविध कला-गुणाचा संगम साधत लोणीच्या प्रवरा सांस्कृतिक आणि क्रिडा महोत्सव २०२३ चा प्रारंभ जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील यांच्या उपस्थित झाला.
महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि स्वा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यालयाच्या प्रांगणात ब्रिलियन बर्डस स्कुल, प्रवरा अभियांत्रिकी महाविद्या इनट्युट ऑफ फार्मसी, प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, प्रवरा ग्रामीण वास्तुशास्त्र महाविद्यालय आणि दुर्गापूर येथील प्रवरा माध्यामिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सामुदायिक, वैयक्तीक नृत्य, नाटकी, गीत गायन करत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.बुधवारी झालेल्या विविध गुणदर्शन कार्यक्रमात सहा शाळा महाविद्यालयातील १६० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
यावेळी गणेश उत्सवानिमित्त होत असलेला प्रवरा सांस्कृतिक आणि क्रिडा महोत्सव – २०२३ हा दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही लोणी परिसरासाठी मोठी पर्वणी ठरत आहे. गटाचे सांस्कृतिक समितीचे समन्वयक प्रा. अंकुश सूर्यवंशी प्रा. अमोल विखे, प्रा. दशरथ खेमनर सौ. कल्पना पडघडमल डॉ. शामल कुंभार, शरद बनगय्या यांच्या टिमने केलेले नियोजन उत्कृष्ठ नियोजन केले.
यावेळी सौ. शालीनीताई विखे पाटील यांत यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतांना आपल्या मिळालेल्या संधीचे सोनं करा अभ्यास बरोबरचं आपली कला ही जतन करा असा संदेश दिला यावेळी लोणी येथील अनिल विखे,सोपान विखे,रामभाऊ विखे,चांगदेव विखे,एन.डी. विखे,दिलीप विखे,संतोष विखे,प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने, डाॅ.रामा पवार, अर्जुन आहेर, डॉ. संजय भवर, डॉ. रविंद्र जाधव, मंजुश्री उबाळे, संध्या रोकडे यांच्यासह लोणी परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी विविध कला क्षैञात नेप्रदिपक यश संपादन करणाऱ्याचा सौ. शालीनीताई विखे पाटील, रणरागिणी महीला मंडळाच्या अध्यक्षा सौ. धनश्रीताई विखे पाटील, संस्थेचे सहसचिव भारत घोगरे, शिक्षण संचालिका सौ. लिलावती सरोदे आणि ग्रामस्थांच्या उपस्थित बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. शांताराम चौधरी यांनी केले.