राहुरी (जनता आवाज वृत्तसेवा):-पाथर्डी तालुक्यातील भोसे व वैजुबाभुळगाव येथे आमदार प्राजक्त तनपुरे यांचा जनता दरबार होता. या गावातील अनेक गोर- गरीब नागरिकांनी आम्हाला कुपनवर रेशनचे धान्य मिळत नाही, साखर तर कधीच मिळत नाही, पावत्या मिळत नसल्याची तक्रार करताच आमदार प्राजक्त तनपुरे यांनी तहसिलदार, नायब तहसिलदार, सर्कल आदिंना तंबी देवुन या रेशनधान्य दुकानदारांचे गोडावूनची पहाणी करायचे आदेश देताच अधिकाऱ्यांनी या धान्य दुकानदाराच्या गोडावुनची झडती घेतली असता मागील वर्षीची दिवाळीत वाटप केली जाणारी साखर अद्याप वाटप न केल्याचे आढळुन आल्याचे समजते.
संबंधित नायब तहसिलदार भानुदास गुंजाळ, सर्कल एस. बी. कानडे,पाथर्डी पोलिस स्टेशनचे पिआय संतोष मुटकुळेसह अधिकाऱ्यांनी वैजुबाभुळगाव व भोसे गावातील स्वस्त धान्य दुकानाचे गोडावुनचा पंचनामा करून स्वस्त धान्य आणि दुकानशील केले यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ हजर होते
यावेळीआ. प्राजक्त तनपुरे यांनी अधिकाऱ्यांना ग्रामस्थांसमोर चांगली कान उघडणे केली या विषयावर प्रश्न विधानसभेत मांडू असे त्यांनी सांगितले सर्वसामान्यांच्या प्रश्नांची दखल घेऊन स्वस्त धान्याचा तालुक्यातील काळ्या बाजाराचा पडदा फास केला या कारवाई बद्दल पाथर्डी तील नागरिकाकडून आमदार तनपुरे यांचे कौतुक होत आहे.
गावातील सर्व नागरिकांनी तक्रारीवरून व आ. तनपुरे यांच्या आदेशानुसार काल वैजू बाभूळगाव व भोजे येथील दुकाने व गोडवून शील करून व तेथील पावत्या जप्त करण्यात आले आहे आणि मालाची व दुकानाची चौकशी करणार असून दोन्हीही पुरवठा खात्याकडून अहवाल मागवण्यात आला आहे.