8.6 C
New York
Sunday, November 24, 2024

Buy now

spot_img
spot_img

मतदार संघातील जनतेच्या आशीर्वादामुळे रस्त्याचे जाळे निर्माण करू शकलो – आ.आशुतोष काळे

कोळपेवाडी ( जनता आवाज वृत्तसेवा ) :- कोपरगाव मतदार संघातील जनतेने सेवा करण्याची संधी देवून दिलेल्या आशीर्वादामुळे मतदार संघात रस्त्याचे जाळे निर्माण करू शकलो असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी रांजणगाव देशमुख येथे एका कार्यक्रम प्रसंगी केले.

रांजणगाव देशमुख येथे जिल्हा वार्षिक योजना ३०५४ अंतर्गत ४० लक्ष रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या रांजणगाव देशमुख ते गोर्डे मळा रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे कामाचे भूमीपूजन आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मतदार संघात रस्ते विकासाचा मोठा अनुशेष असल्यामुळे विकासाला मर्यादा येत होत्या. त्यामुळे रस्ते विकासाचा अनुशेष भरून काढण्याचे उद्दिष्ट् डोळ्यासमोर ठेवून रस्ते विकासाला मोठ्या प्रमाणात निधी मिळविण्यात यश आले त्यामुळे संपूर्ण मतदार संघात रस्त्यांचे जाळे निर्माण झाले असले तरी यामागे मतदार संघातील जनतेचे आशीर्वाद असल्यामुळेच हे शक्य झाले आहे. खड्ड्याच्या रस्त्यांचा प्रवास करतांना झालेला त्रास सहन करणाऱ्या मतदार संघातील नागरिकांची रस्त्यांची मोठी अडचण दूर झाल्यामुळे बहुतांश रस्त्यांचा प्रवास सुखकर झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाकडून रस्त्याच्या निर्मितीबाबत कौतुकास्पद शब्द बाहेर पडतात त्याचे मोठे समाधान मिळत आहे. रस्त्यांच्या जाळ्यामुळे अनेक गावे मुख्य रस्त्यांना जोडली जावून विकासाला चालना मिळाली असून यापुढील काळातही आपल्या आशीर्वादाने उर्वरित सर्वच रस्त्यांचा विकास करणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले. तसेच निळवंडे डाव्या कालव्यातून तात्पुरत्या एस्केपमधून गावतळी, पाझर तलाव, बंधारे भरून देण्याच्या सूचना आ. आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाला दिल्या व निळवंडे डाव्या कालव्याची पाहणी केली.

यावेळी तहसीलदार संदीपकुमार भोसले, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक शंकरराव चव्हाण, सरपंच सौ.जिजाबाई मते, गजानन मते, जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे संचालक संतोष वर्पे, के.डी. खालकर, बहादरपुरचे सरपंच गोपीनाथ रहाणे, नंदकिशोरऔताडे, संपतराव खालकर, कैलास गव्हाणे, ज्ञानेश्वर गव्हाणे, आत्याभाऊ वर्पे, रावसाहेब कोल्हे, दशरथ खालकर, तान्हाजी खालकर, कौसर सय्यद, सिकंदर इनामदार, शिवाजीराव वामन, सुरेश गोर्डे, भाऊसाहेब गोर्डे, सचिन वामन, संदीप गोर्डे, अनिल वर्पे, रविंद्र गोर्डे, सचिन गोर्डे, सागर गोर्डे, नितीन गोर्डे, शिवाजी चव्हाण, अण्णासाहेब चव्हाण, महेश गोर्डे, सुनील वर्पे, रवींद्र वर्पे, सागर वामन, संदीप खालकर, समाधान वामन, रामदास वामन, अनिल गोर्डे, रामा वामन, चंद्रभान ठोंबरे, बाळासाहेब वामन, नवनाथ गोर्डे, दत्तात्रय गोर्डे, दत्तात्रय खकाळे, ज्ञानदेव चव्हाण, विक्रम ठोंबरे, दत्तात्रय वामन, भारत वर्पे, अण्णासाहेब वर्पे, अविनाश गोर्डे, सर्जेराव खालकर, नरहरी चव्हाण, फारुख मनियार, प्रमोद गुडघे, वैभव मते, भाऊपाटील रहाणे, अण्णासाहेब ठोंबरे, गणेश चव्हाण, सुखदेव खालकर, रावसाहेब देशमुख, विजय कोटकर, शिवाजी रहाणे, चंद्रकांत ठोंबरे, पर्बत गव्हाणे, रंगनाथ गव्हाणे, सखाहरी बोरनर, भाऊसाहेब रणधीर, दत्तु गव्हाणे, प्रदीप गव्हाणे, विजय गव्हाणे, जीजाबापू गव्हाणे, निळवंडे पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता विवेक लव्हाट, पंचायत समिती गायकवाड, ठेकेदार चकोर आदींसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!