आश्वी दि.२२( जनता आवाज वृत्तसेवा ):-ग्रामीण भागातील विद्यिर्थी सर्वच क्षेञात आघाडीवर आहेत.त्यांना व्यासपीठ मिळावे म्हणून प्रवरेचा सास्कृतिक महोत्सव परिपुर्ण ठरत असून यातून उपजत कलेला संधी मिळत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील कला, विज्ञान, वाणिज्य व संगणकशास्त्र महाविद्यालय व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतन व कनिष्ट महाविद्यालयात राज्याचे महसूल ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि खा. डॉ.सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली “प्रवरा सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव २०२३” चे उदघाटन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांच्या शुभहस्ते उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अण्णासाहेब भोसले पाटील, विखे पाटील कारखान्याचे संचालक डॉ.दिनकरराव गायकवाड, रामभाऊ पाटील भुसाळ, बापूसाहेब पाटील गायकवाड, भाऊसाहेब ज-हाड , भगवानराव इलग,अण्णासाहेब म्हस्के पाटील, जि.प.सदस्या सौ.रोहिणीताई निघुते, माजी जि.प.सदस्या सौ.कांचनताई मांढरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी “प्रवरा सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव २०२३” चे समन्वयक डाॅ.राम पवार , महोत्सवाचे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतन व कनिष्ट महाविद्यालयाचे प्राचार्य सयराम शेळके , प्रा.देविदास दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ महाविद्यालय व माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सहकार्याने तसेच विद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाचे डॉ .सोमनाथ भुमकर,प्रा.रविंद्र कदम प्रा.ज्ञानेश्वर खर्डे , प्रा. मोना निचळ यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतन व कनिष्ट महाविद्यालय आश्वी खुर्द, प्रवरा माध्यमिक विद्यालय प्रिप्री लौकी, खंडेराव पाटील खेमनर माध्यमिक विद्यालय ओझर व प.पू. गगनगिरी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपरणे या विद्यालयातील एकूण ३६९ विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट असे विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर करून उपस्थित प्रेक्षकांचे मनोरंजन केले.