25 C
New York
Wednesday, September 3, 2025

Buy now

spot_img
spot_img

मुख्यमंत्री सहायता कक्ष ठरत आहेत.. रुग्णांसाठी जाधव यांच्या रुपात “देवदूत”

राहाता( जनता आवाज वृत्तसेवा):– मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षामुळे राहाता तालुक्यातील गंभीर आजारावरील रुग्णांना मदत मिळण्यासाठी मोठी मदत मिळत आहे.राहाता तालुक्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाने शिर्डी लोकसभेचे खा.सदाशिव लोखंडे यांच्या सहकार्याने राहाता तालुक्यात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हा प्रमुख श्री जितेंद्र जाधव यांच्या मदतीने आता पर्यंत गंभीर आजारांवर उपचारासाठी अनेक रुग्णांना लाखो रुपयांची मदत मिळालेली आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून हृदय प्रत्यारोपण, कॉकलियर इम्प्लांट ( वय वर्ष २ ते ६), हृदय प्रत्यारोपण,यकृत प्रत्यारोपण,किडणी प्रत्यारोपण,बोन मॅरो प्रत्यारोपण,फुफ्फुस प्रत्यारोपण,हाताचे प्रत्यारोपण,हिप रिप्लेसमेंट,कर्करोग शस्त्रक्रिया,अपघात शस्त्रक्रिया,लहान बालकांचे शस्त्रक्रिया,मेंदूचे आजार,हृदयरोग ,कर्करोग (केमोथेरपी/ रेडिएशन),नवजात शिशुंचे आजार,गुडघ्याचे प्रत्यारोपण,बर्न रुग्ण,विद्युत अपघात रुग्ण या आजारांवर अर्ज केल्यास मदत मिळत आहे अशी माहिती वैद्यकीय मदत कक्षाचे जितेंद्र जाधव यांनी दिली.

जितेंद्र जाधव यांनी म्हंटले आहे कि महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रूपाने महाराष्ट्रातील रुग्णांना देवदूत भेटले आहेत.अडचण तिथे मुख्यमंत्री शिंदे हेच समीकरण सर्वत्र पहावयास मिळत आहे.राजकारणाच्या पलीकडे जाऊन ना.शिंदे साहेब जनसामान्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.त्यांच्या कामाचा ओघ पाहता नव्या पिढीतील तरुण त्यांच्या पाठीमागे खंबीर पणे उभे राहत आहेत.

राहाता तालुक्यातील साकुरी येथील  महेंद्र भाऊसाहेब गायकवाड यांना 2 लक्ष रुपयांची मदत शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हा प्रमुख श्री जितेंद्र जाधव यांच्या प्रयत्नामुळे मिळाली आहे.

राहाता तालुक्यात मुख्यमंत्री वैद्यकीय मदत मिळविण्यासाठी काही अडचण भासल्यास गणेश दंडवते,किरण कुलथे,कुणाल धनक यांच्याशी संपर्क साधण्याचे अवाहन शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हाप्रमुख जितेंद्र जाधव यांनी केले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!