spot_img
spot_img

शेतकरी सन्मान योजनेत केवळ २५ हजार शेतकऱ्यांना लाभ, अन्य शेतकरी कशामुळे अपात्र – आमदार प्राजक्त तनपुरे यांचा विधानसभेत सवाल

राहुरी( जनता आवाज वृत्तसेवा ):-

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या नगर जिल्ह्यातील सद्यस्थितीबाबत राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी मंगळवारी विधानसभेत प्रश्न उपस्थित करून योजनेबाबत लक्ष वेधले .
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या नगर जिल्ह्यातील लाभार्थ्यांमध्ये चार वर्षांमध्ये निम्म्याने घट झाली .राहुरी मतदार संघातील नगर , पाथर्डी आणि राहुरी तालुक्यातील एक लाख 37 हजार शेतकरी लाभार्थ्यांपैकी केवळ 25 हजार शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ झाला असून अन्य शेतकरी कशामुळे अपात्र ठरले आहेत ? असा सवाल राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी विधानसभा अधिवेशनात मांडून सभागृहाचे लक्ष वेधले .
सध्या विधानसभेचे अधिवेशन मुंबईत सुरू असून तनपुरे यांनी शेतकऱ्यांच्या विविध मुद्द्यांवर लक्षवेधी द्वारे सभागृहात प्रश्न उपस्थित केले आहेत . मंगळवारी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी शेतकरी सन्मान योजनेबाबत प्रश्न उपस्थित करून म्हटले की , पी.एम किसान योजना फेब्रुवारी 2019 ला सुरू करण्यात आली . त्यावेळी नगर जिल्ह्यात या योजनेचा पहिला हप्ता सहा लाख 87 हजार 400 शेतकऱ्यांना देण्यात आला . मात्र मागील शेवटचा 13 वा हप्ता केवळ तीन लाख 36 हजार शेतकऱ्यांना देण्यात आला . म्हणजेच निम्म्याहून अधिक लाभार्थी शेतकरी अपात्र ठरले आहेत .
 राहुरी विधानसभा मतदारसंघातही अशाच पद्धतीने शेतकऱ्यांची संख्या कमी कमी होत गेली आहे . ही माहिती माहितीच्या अधिकारात मिळाली असल्याचे तनपुरे यांनी नमूद केले. आमदार तनपुरे म्हणाले की , राहुरी विधानसभा मतदारसंघात शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता 45 हजार शेतकऱ्यांना प्राप्त झाला . मात्र शेवटचा 13 वा हप्ता केवळ 8 हजार शेतकऱ्यांना मिळाला . पाथर्डी तालुक्यातील 50 हजार शेतकऱ्यांना पहिला हप्ता मिळाला , आणि 13 वा हप्ता 8 हजार शेतकऱ्यांना मिळाला . तसेच नगर तालुक्यातील 42 हजार शेतकऱ्यांना पहिला हप्ता मिळाला तर केवळ 9 हजार 800 शेतकऱ्यांनाच या योजनेचा 13 वा हप्ता प्राप्त झाला . कोणत्या कारणांमुळे हे शेतकरी अपात्र झाले आहेत ? असा सवाल तनपुरे यांनी सभा सभागृहात उपस्थित केला .
दरम्यान प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा 14 वा हप्ता याच आठवड्यात देशभरातील शेतकऱ्यांना तसेच नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही मिळणार आहे . या पार्श्वभूमीवर आमदार प्राजक्त तनपुरे यांनी नगर जिल्ह्यातील विशेषतः राहुरी विधानसभा मतदारसंघातील अपात्र शेतकऱ्यांचा प्रश्न प्रश्नावर विधानसभेत लक्ष वेधल्याने सन्मान योजनेचा प्रश्नाबाबत राहुरी तालुक्यात व राहुरी विधानसभा मतदारसंघातील पाथर्डी आणि नगर तालुक्यात शेतकऱ्यांमध्ये चर्चा होत आहे .
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!