कोळपेवाडी ( जनता आवाज वृत्तसेवा ) :- कोपरगाव मतदार मतदारसंघात झालेला विकास मतदार संघातील जनतेच्या विश्वासाची परतफेड आहे. मतदार संघाच्या विकास कामांसाठी दोन हजार कोटीच्या वर निधी मिळविण्यात यशस्वी झालो असून सत्ताधारी पक्षाचा आमदार या नात्याने सत्तेचा उपयोग फक्त विकासासाठीच केला असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी मतदार संघातील गोधेगाव व घोयेगाव येथे विविध विकास कामांच्या लोकार्पण प्रसंगी केले.
गोधेगाव येथे १० लक्ष रुपये निधीतून करण्यात आलेल्या यशवंतजी चंदनशिव वस्ती ते काटवणे वस्ती रस्ता खडीकरण करणे व २१ लक्ष रुपये निधीतून बांधण्यात आलेल्या ग्रामपंचायत कार्यालय, ७ लक्ष रुपये निधीतून बसवण्यात आलेल्या ओपन जिम साहित्याचे व ४ लक्ष रुपये निधीतून बसवण्यात आलेल्या आर.ओ. प्लॅन्टचे आणि घोयेगाव येथे २० लक्ष रुपये निधीतून करण्यात आलेल्या इजिमा २१५ घोयेगाव – उक्कडगाव रस्ता डांबरीकरण करणे कामाचे व १० लक्ष रुपये निधीतून करण्यात आलेल्या लालुबाबा सोळसे वस्ती ते एक्स्प्रेस कॅनॉल रस्ता खडीकरण करणे कामाचे लोकार्पण आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी कारभारी आगवन आहोते.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, सत्ताधारी पक्षाचा आमदार असल्यानंतर निधी मिळविण्यात अडचणी येत नाहीत मात्र निधी देखील मिळविता आला पाहिजे त्यासाठी विकास करण्याची तळमळ देखील तेवढीच महत्वाची आहे. मतदार संघाचा विकास हे एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवून केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना यश मिळत गेले व दोन हजार कोटीच्या वर निधी मतदार संघाच्या विकासासाठी मिळविता आला. या निधीतून मतदार संघातील प्रत्येक गावाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे लाभ देवून रस्ते, पाणी, वीज, आरोग्य आदी मुलभूत प्रश्न सोडविले आहे. विकासासाठी अजूनही निधीची आवश्यकता आहे. त्यासाठी अखंडपणे पाठपुरावा सुरु असून मतदार संघासाठी निधीचा ओघ असाच सुरु राहणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले. तत्पूर्वी आ. आशुतोषदादा काळे यांनी रयत शिक्षण संस्थेचे, न्यु इंग्लिश स्कुल, गोधेगाव येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रम प्रसंगी कर्मवीर आण्णांना अभिवादन केले. त्यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना पुस्तके वाटण्यात आले. यावेळी त्यांनी पाणीपुरवठा योजनेच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी देखील केली.
याप्रसंगी गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मच्छिन्द्र बर्डे, संचालक दिलीपराव बोरनारे, सुधाकर रोहोम, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, संचालक शिवाजीराव शेळके, संदीप शिंदे, गौतम कुक्कुटपालनचे संचालक भाऊसाहेब भवर, गोदावरी खोरेचे संचालक विक्रम सिनगर, गौतम बँकेचे माजी संचालक प्रकाश शिंदे, सुदामराव भाटे आदींसह वाल्मिकराव भोकरे, शिरसगावचे सरपंच अशोक उकिरडे, गोधेगावचे सरपंच अशोक भोकरे, पढेगावचे सरपंच बाबासाहेब शिंदे, भोजडेचे सरपंच सरपंच सुधाकर वादे, सोसायटीचे चेअरमन गणपतराव भोकरे, डॉ. कृष्णा मलिक, अशोक घेरे, सुदाम माने, कडूबा भोकरे, रामदास खटकाळे, राजेंद्र खिलारी, वाल्मिक भोकरे, अमृत शिंदे, रावसाहेब भोकरे, माधवराव रांधवणे, श्रीधर शिंदे, विनायक भोकरे, भीमराज भोकरे, रोहित भोकरे, रामदास काटवणे, यशवंत चंदनशिव, भाऊसाहेब सोळसे, सुजित भोकरे, कुणाल पवार, राहुल भोकरे, महेश भोकरे, गणेश कानडे, संदीप चंदनशिव, प्रविण चौधरी, रोहित चंदनशिव, बाळासाहेब भवर, गुलाबराव भोकरे, सागर साळुंके, संतोष भुजाडे, नारायण सालके, नरेंद्र भोकरे, भीमराज काटवणे, संदीप रांधवणे, गोविंद भोकरे, नारायण नवले, सुरेश भानगुडे, पुंजाहरी भोकरे, आबासाहेब भोकरे, उत्तमराव सोळसे, बापू भुजाडे, रामचंद्र भाटे, अनिल भोकरे, अखिलेश भाकरे, दिलीपराव आबक, गणपत भोकरे, नारायण नवले, रोहित भोकरे, प्रविण भोकरे, दादासाहेब चंदनशिव, राहुल भोकरे, रामदास काटवणे, गौरव भोकरे, भाऊसाहेब सोळसे, साई सोळसे, अक्षय सोळसे, बाबासाहेब चंदनशिव, शहादू गायकवाड, हिरामण गुंजाळ, सुहास भोकरे, भूषण भोकरे, भाऊसाहेब भोकरे, बापू भोकरे, गोकुळ भोकरे, सुजित भोकरे, श्रीधर शिंदे, महेश भोकरे, सागर भोकरे, शरद चंदनशिव, राहुल चंदनशिव, भीमराज काटवणे, शामराव सोळसे, प्रसाद सोळसे, शंकर सोळसे, सागर भोकरे, राजेंद्र शिंदे, राकेश रांधवणे, शैलेश रांधवणे, नंदकिशोर रांधवणे, सूरज हुसळे, रघुनाथ बोरनारे, विनोद रांधवणे, विनोद भोकरे, एकनाथ शिंदे, विजय कदम, गणेश दाणे, संदीप शिंदे, पोपटराव भुजाडे, सुलतान पटेल, दिनकरराव भुजाडे, दत्तू भुजाडे, घोयेगाव येथे सुदमराव माने, राजेंद्र माने, मयुर माने, रावसाहेब माने, उत्तमराव माने, धर्मा गव्हाळे, सोमनाथ सोळसे, गुरु गव्हाळे, पप्पू गव्हाळे, रामा भानगुडे, नारायण भानगुडे, आण्णासाहेब गव्हाळे, लालू सोळसे, शिवाजी भानगुडे, नारायण कारभार, धनंजय भानगुडे, ऋषिकेश वाकचौरे, साहेबराव आभाळे, कैलास माने, रमेश बारहाते, संतोष भानगुडे, शरद भानगुडे, योगेश माने, शेख सर, रविंद्र भानगुडे, गणेश गव्हाळे, प्रल्हाद भाटे, आबासाहेब भानगुडे, अनिल सोळसे, पप्पू सोळसे, संजय सोळसे, गोपीनाथ भाटे, रामदास भोकरे, विजय टुपके, अशोक आभाळे, भाऊसाहेब भानगुडे, सुरेश भानगुडे, नंदू गव्हाळे, साहेबराव भानगुडे, दादासाहेब कारभार, सुनील कारभार, कचरू भाटे, रामचंद्र भाटे, गणेश गव्हाळे, कृष्णा कारभार, विजय भानगुडे, अतुल सोळसे, सोमनाथ सोळसे, चांगदेव सोळसे, ऋषीकेश गव्हाळे, प्रसाद भोकरे, दिलीप बर्डे, साहेबराव भवर आदींसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे सोनवणे, राऊत, पंचायत समिती उपअभियंता सी.डी. लाटे, शाखा अभियंता ए.पी. वाघ, ठेकेदार शुभम शिंदे, अनिल दवंगे, देवेंद्र दहे, संकेत बागल, ग्रामसेवक सुधाकर पगारे, जगताप मॅडम आदींसह गोधेगाव व घोयेगावचे ग्रामस्थ उपस्थित होते.