आंबी ( जनता आवाज वृत्तसेवा ) : – राहुरी तालुक्यातील राजकीय दृष्ट्या व आर्थिक दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या आंबी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी सभासदांना दीपावली पूर्वी ९% डिव्हीदंड वाटप करणार असल्याचे संस्थेचे विद्यमान चेअरमन सतिशराव जाधव यांनी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधरण सभेत सांगितले. सभेच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे माजी चेअरमन भागवतराव कोळसे हे होते. सर्वांच्या सहकार्यातून संस्थेला रु. ६३५०६५ नफा झाला असून यापुढे असेच सहकार्य सर्वांनी करावे ,अध्यक्षीय भाषणातून माजी चेअरमन भागवतराव कोळसे यांनी सांगितले.
प्रारंभी संस्थेच्या कार्यालयातील युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन नूतन पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. अँड.सागर कोळसे यांनी सचिव पवार, व सेल्समन सालबंदे यांना एक महिन्याचा पगार बोनस म्हणून देण्यात यावा अशी सुचना मांडली. त्यास सर्वानुमते अनुमोदन देण्यात आले.सभेच्या नूतन पदाधिकारी यांचा संस्येच्या वतीने संस्थेचे मार्गदर्शक बाळकृष्ण कोळसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सचिव विश्वासराव पवार यांनी विषय पात्रिकेवरील सर्व १५ विषयावर सविस्तर चर्चा होऊन सर्व विषय एकमताने मंजुर करत सभा खेळी मेळीत व शांततेत पार पडली.
यावेळी डॉ. तनपुरे सह.साखर कारखान्याचे माजी संचालक बाळकृष्ण कोळसे,शिवाजीराव कोळसे, मा.चेअरमन भागवतराव कोळसे, व्हा.चेअरमन सोमनाथ साळुंके,रावसाहेब सालबंदे, किसनराव साळुंके,बाळासाहेब रे. डुकरे, हरिश्चंद्र साळुंके,बाळसाहेब डुकरे,मनोहर साळुंके,कचरू रोडे,साहेबराव डुकरे, अण्णासाहेब कोळसे,भास्करराव कोळसे,मच्छिंद्र जाधव,भानुदास लोंढे, तसेच सभासद चंद्रकांत पा.कोळसे चांगदेव डुकरे,रंगनाथ साळुंके, बबनराव साळुंके,विठ्ठल पंत कोळसे,कारभारी डुकरे,भाऊसाहेब साळुंके, सोमनाथ साळुंके,नंदकिशोर जाधव,अँड सागर कोळसे, नितिन कोळसे,नारायण जाधव, अच्युतराव जाधव, गोरक्षनाथ साळुंके,एकनाथ पाळंदे,अशोक साळुंकेसर,अप्पासाहेब कोबरणे, बाळासाहेब साळुंके,कडूभाई इनामदार पत्रकार विश्वनाथ जाधव यांचेसह आदि सभासद मोठ्या रुंख्येने उपस्थीत होते.