18.7 C
New York
Wednesday, September 10, 2025

Buy now

spot_img
spot_img

मुठेवडगांव सोसायटीची वार्षिक सभा शांततेत सभासदांना पंधरा टक्के लाभांश जाहीर

माळवाडगाव ( जनता आवाज वृत्तसेवा ):-राजकारणातील महत्त्वाच्या मुठेवाडगाव सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्व विषय संमत होऊन खेळीमेळीच्या वातावरणात शांततेत पार पडली.

 सोसायटीची सर्वसाधारण वार्षिक सभा संस्थेच्या प्रांगणात डॉ शंकरराव मुठे भाजप तालुका उपाध्यक्ष व शिवाजीराव मुठे व्हा.चेअरमन कारेगाव भाग यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संस्थेचे विद्यमान चेअरमन शकुंतला संपत मुठे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. विषय पटलावरील सर्व विषय चर्चेनंतर मंजूर करण्यात आले. यावेळी डॉ शंकरराव मुठे यांनी चालू आर्थिक वर्षामध्ये १२ लाख ६८ हजार ४५८ रुपये नफा झाला झाल्याचे घोषित केले, संस्थेचे भाग भांडवल ५२ लाख १६ हजार ५३६ रुपये आहे. सन. २०११ नंतर प्रथमच सभासदांना १५ टक्के लाभांश डॉ मुठे यांनी जाहीर केला. 

यावेळी चर्चेत ॲड दिलीप मुठे यांनी सभासदांना लाभांश १५ टक्के पेक्षा जास्त वाढवता येईल का ? तर बँकेच्या नियमा प्रमाणे १५ टक्के पेक्षा जास्त देता येत नाही असे डॉ मुठे यांनी सांगितले, दुष्काळ जाहीर करा व पिक विमा मिळावा असा ठराव करावा अशी सूचना मांडली चर्चेमध्ये सुभाषराव मुठे,बबनराव मुठे,रमेश मुठे,भिकचंद मुठे,गणेश गोसावी,विश्वास क्षीरसागर,भाऊसाहेब शे.मुठे, ज्ञानदेव म.मुठे आदिनी अनेक विषय मांडून चर्चेत भाग घेतला. संस्थेचे वतीने डॉ मुठे, व शिवाजीराव मुठे त्यांनी उत्तरे दिली.

यावेळी मुठेवाडगाव ग्रामपंचायतचे ग्रामसेवक सुधीर उंडे यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल, अभिजीत मुठे याची शिर्डी येथे प्रोटोकॉल प्रतिनिधी शासकीय सेवेत निवड झाल्याबद्दल तसेच १२ वर्षा नंतर सोसायटीने १५% लाभांश दिल्याबद्दल सोसायटीचे मा.चेअरमन डॉ.शंकरराव मुठे यांचा सभासदांच्या वतीने पेढे वाटून सत्कार करण्यात आला.

सभेसाठी संचालक संभाजी गोसावी, भास्करराव मुठे,अण्णासाहेब मुठे,प्रा रंगनाथ कोळसे, तुकाराम रूपटके,शेषराव मुठे, सुदामराव आसने,शरद जासूद, पोपटराव मुठे, जयराम मुठे, लहानू मुठे, गोकुळ मुठे, रमेश नाईक,शरद मुठे,विष्णू जासूद,बाबासाहेब मुठे, सदाफळ,अनिल पाचपिड,योगेश बोरुडे, शाम बोरुडे,किरन मुठे, विलास खैरे,बापू कोरडे आदी मान्यवर उपस्थित होते संस्थेचे सचिव दत्तात्रय जासूद यांनी अहवाल वाचन केले.

व्हा. चेअरमन मुठेंच्या राजीनाम्याची मागणी मुठेवाडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीवर नवीन संचालक मंडळ अस्तित्वात आल्यानंतर दरवर्षी चेअरमन व व्हा.चेअरमन पदाचे एक एक वर्षासाठी रोटेशन करण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार माजी चेअरमन डॉ शंकरराव मुठे यांनी चेअरमन पदाचा राजीनामा देऊन चेअरमनपदी सौ.शकुंतला संपत मुठे यांची निवड करण्यात आली मात्र व्हा.चेअरमन बबनराव मुठे यांनी राजीनामा न दिल्याने संस्थेचे सभासद ज्ञानदेव मल्हारी मुठे, भिकचंद मुठे व गणेश गोसावी यांनी व्हा.चेअरमन मुठे यांनी राजीनामा देण्याची मागणी केली.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!