spot_img
spot_img

धरणग्रस्ताचे न्याय न मिळाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

नेवासा ( जनता आवाज वृत्तसेवा):- पुनर्वसन जमिनी वर्ग १करण्याची प्रक्रिया गेली पाच वर्षापासून स्थगित असून उपआयुक्त नाशिक यांना १५/११/१९ रोजी मागवलेले मार्गदर्शनावर फक्त कागदी घोडे नाचऊन वेळ मारून नेली जात आहे.त्या संदर्भात निर्णयासाठी प्रधान सचिव यांची तातडीने बैठक घेऊन निर्णय घ्यावा अन्यथा दि. ०३/१०/२०२३ रोजी जिल्हा अधिकारी कार्यालय अहमनगर समोर उपोषण करुन ६ मजल्यावरुन उडया मारुन आत्महत्या करण्यात येईल व याची सर्व जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशारा पुनर्वसन कृती समितीचे दिगंबर अवारे यांनी निवेदाद्वारे दिला आहे. तसेच या आंदोलनाला शेतकरी संघटनेने पाठींबा दिला असुन या प्रश्नांवर जिल्हाभर आंदोलन करणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष त्रिंबक भदगले यांनी दिला आहे . 

शेवगांवच्या धरणग्रस्ताच्या सं न १९७१ ला वर्ग १ च्या जमिनी संपादीत झाल्या व माळी चिचोरा ता. नेवासा येथे ४६२९ फेरने जिल्हा अधिकारी यांच्या आदेशानुसार मा. तहसीलदार नेवासा यांनी पुनर्वसनसाठी फॉरेस्ट क्षेत्र राखुन ठेवले व जिल्हा पुनर्वसन अधिकारी तथा उपसंचालक अ.नगर यांनी ४७८१ फेरने या जमिनी वाटप केल्या व २०१९ पर्यंत वन विभागाचा दाखला न घेता जिल्हा पुनर्वसन अधिकारी अ. नगर उप आयुक्त पुनर्वसन नाशिक यांनी मोठ्या प्रमाणात जमिनी वर्ग २ मधून वर्ग १ केल्या त्यानंतर पुनर्वसन जमीनी १५ दिवसात वर्ग २ मधून वर्ग १ करण्याचा जी.आर. दि. ४/०६/२०१९ रोजी आला व सर्व प्रक्रिया स्थगित करण्यात आली. त्यानंतर जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांनी दि. १५/११/२०१९ ला उपआयुक्त नाशिक यांना मार्गदर्शन मागवले व त्यांनी मदत व पुनर्वसन सचिव यांनी दिनांक २५/६/२०२१ रोजी व त्यांनी दिनांक २९/०९/२०२१ ला जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांना त्यांचा अहवाल

२०/०६/२०२२ ला उप आयुक् पुनर्वसन सचिव यावर त्यांनी प्रभारी वनविभाग नाशिक दिनांक २४/०८/२०२२ रोजी त्यांनी वन रक्षकांनी १८/०८/२०२३ ला पत्र दिलेले आहे. त्यावर अद्याप कोणताच निर्णय घेतला नाही फक्त वेळ मारून नेण्याचे काम चालू आहे तरी महसुल विभागाचे प्रधान सचिव ,वन विभागाचे प्रधान सचिव, मदत व पुनर्वसवन मार्गदर्शनाचा माहिती अहवाल पुर्ण झाला आहे.सदर विभागाचे प्रधान सचिव यांची बैठक घेऊन निर्णय घ्या अन्यथा दि. ०३/१०/२०२३ रोजी जिल्हा अधिकारी कार्यालय अहमनगर समोर उपोषण करुन ६ मजल्यावरुन उडया मारुन आत्महत्या करण्यात येईल याची जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशारा दिगंबर अवारे यांनी दिला आहे .

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!