लोणी दि.२३( जनता आवाज वृत्तसेवा ):-शिर्डी मतदार संघात महसूल मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेला आणि खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवरा सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सवाने प्रवरानगरी दुमदुमली.शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्याच्या कला अविष्कार सादर करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
शालेय ते महाविद्यालयीन पातळीवरील मुला-मुलींच्या उपजत कला व क्रीडा गुणांना व्यासपीठ मिळावे आणि स्थानिक नागरिकांना आपल्याच मुलांच्या विविध कलागुणांतून मनोरंजन व्हावे, या उदात्त व प्रामाणिक उद्देशाने पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर हा सांस्कृतिक महोत्सव आयोजित केलेल्या या सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील,,पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे पाटील , ट्रक सोसायटीचे चेअरमन नंदकुमार राठी,डाॅ. सुश्मिता विखे पाटील,रणरागिणी महीला मंडळाच्या अध्यक्षि सौ.धनश्रीताई विखे पाटील, संस्थेच्या शिक्षण संचालिका सौ.लीलावती सरोदे यांची प्रमुख उपस्थिती होती. सांस्कृतिक महोत्सवाच्या दुस-या दिवशी प्रवरा परिसरातील अनेक संस्थांच्या विविध शाखेतील विद्यार्थ्यांनी आपला कलाविष्कार सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.यात वैयक्तिक गायन, गणेश वंदना,एकपात्री प्रयोग, समूहगायन,समूहनृत्य,विधायक संदेश देणाऱ्या नाटिका, संगीत नाटिका,देशभक्तीपर गीते,सामाजिक संदेश देणा-या एकांकिका इ.सादर करण्यात आल्या.सांस्कृतिक महोत्सवामुळे उपस्थित रसिक श्रोत्यांना मनोरंजनाची अनोखी पर्वणी मिळाली.यात प्रवरा पब्लिक स्कूल,प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूल, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील विद्यालय बाभळेश्वर, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सैनिक स्कूल लोणी, प्रवरा पॉलीटेक्निक कॉलेज लोणी, महात्मा गांधी विद्यालय प्रवरानगर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रवरानगर,प्रवरा माध्यमिक विद्यालय दुर्गापूर,,ब्रिलीयंट बर्ड स्कुल,लोणी इ. शाखांचा समावेश होता
यावर्षीचा प्रवरा सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव हा २८ सप्टेंबर २०२३ पर्यंत विविध प्रकारच्या उपक्रमातून व सांस्कृतिक कार्यक्रमांतून साजरा होणार आहे. तरी परिसरातील सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. असे प्रवरा पब्लिक स्कूलचे प्राचार्य डॉ. बी.बी अंबाडे , आय.टी.आयचे प्राचार्य अर्जुन आहेर,तंञनिकेतनचे प्राचार्य डॉ.व्ही.आर राठी, यांनी नागरिकांना आवाहन केले.
बाभळेश्वरच्या दिव्यांग मुलांचे गायन आणि नृत्य,ब्रिलीयंट बर्ड स्कुलच्या चिमुकल्यानी सादर केलेले नवदुर्गा,दुर्गापूर विद्यालयांची लेक वाचवा नाटीका आदीसह सर्वच कार्यक्रमला प्रेक्षकांनी भरभरुन दाद दिली.



