spot_img
spot_img

पायरेन्सचे डाॅ.मोहसीन तांबोळी यांची वाणिज्य व व्यवस्थापन विद्या शाखेच्या अभ्यास मंडळावर निवड

लोणी दि.२७ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नुकत्याच विविध अभ्यास मंडळवरील नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. पायरेन्स चे डाॅ.मोहसीन अब्बास तांबोळी यांची वाणिज्य व व्यवस्थापन विद्या शाखेअंतर्गत विपणन या विषयाच्या अभ्यास मंडळावर तज्ञ व्यक्ती म्हणून पाच वर्षासाठी नियुक्ती जाहीर झाली आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यानुसार व्यवसायिक अभासक्रमाच्या नामांकित संस्थेतील तज्ञ व्यक्तींची विद्यापीठामार्फत अभ्यास मंडळांवर नियुक्ती होत असते.

डॉ.तांबोळी हे वाणिज्य व व्यवस्थापन या क्षेत्रात ११ वर्षापासून कार्यरत आहे त्यांच्या व्यवस्थापन व शिक्षण क्षेत्रातील कार्याची दखल घेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने त्यांची अभ्यास मंडळावर निवड केली आहे. 
    
डॉ.मोहसीन तांबोळी यांच्या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील, खा.डाॅ.सुजय विखे पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुप्रियाताई ढोकणे, संस्थेचे सचिव डाॅ.निलेश बनकर यांच्यासह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!