spot_img
spot_img

खोट्या ॲट्रॉसिटीच्याा विरोधात मराठा एकीकरणचा निषेध मोर्चा

राहुरी( जनता आवाज वृत्तसेवा):- राहुरी येथे देसवंडी ता.राहुरी येथिल गावात गुरुवार दि.१४/०९/२०२३ रोजी बैल पोळा सणाच्या दिवशी सायंकाळी काही तरुणांन मध्ये किरकोळ वाद होऊन राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यानंतर गावातील काही अपप्रवृत्तींच्या लोकांनी खोटा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला, त्याच्या निषेधार्त मराठा एकीकरण समिती राहुरी तालुका व देसवंडी गावाचे ग्रामस्थ यांच्या वतीने निषेध नोंदवत राहुरी पोलिस ठाण्याचे पो.नि. धनंजय जाधव यांना निवेदन देण्यात आले.

या प्रसंगी रावसाहेब खेवरे म्हणाले की देसवंडी गावात सर्वसमाजाचे नागरिक एकोप्याने राहत आले आहेत.परंतु अडचण बाहेर गावच्या लोकांनी गावातील नागरिकांना पुढे घालून खोटी ॲट्रॉसिटी दाखल केलेली आहे गावातील सामाजिक सलोख्याचा वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत आहेत.

सुरेश शिरसाठ सर म्हणाले की ज्या युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेल्या आहेत त्यापैकी काही युवक शिक्षण घेत असून तर काही लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत या प्रकरणाशी या विद्यार्थ्यांचा कुठल्याही प्रकारचा संबंध नसताना केवळ आकाश बुद्धीने त्यांचे नावे घालून त्यांचं पुढील भविष्य खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांच्यावर जे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहे ते तात्काळ मागे घेण्यात यावेत.

विलास शिरसाठ म्हणाले की आत्तापर्यंत गावामध्ये कुठलेही वाद असतील तर ते गावातच सोडवण्याचा प्रयत्न करत असतो हे वाद देखील गावातल्या गावातच मिटून घेणं गरजेचे आहे.

मराठा एकीकरण समितीचे देवेंद्र लांबे म्हणाले की पोलिस प्रशासनाने दाखल झालेल्या खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्यांचा सखोल तपास करावा.अशा प्रकारे खोटे ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झाल्याने राहुरी तालुक्याचे नाव बदनाम होत आहे असे लांबे म्हणाले.

या प्रसंगी मराठा एकीकरण समितीचे समन्वयक नितीन कल्हापुरे,सुभाष जंदरे,राजेंद्र लबडे,अनिल चत्तर,साईनाथ कदम, सुनील निमसे,बलराज पाटील,डॉ.प्रकाश पवार,संपत भिसे गणेश भिसे आकाश लवांडे गणेश पवार सुनील पवार राहुल पवार अमोल शिरसाठ स्वप्नील शिरसाठ आदेश कोकाटे अमोल कोकाटे,नितीन कल्हापूरे,अविनाश शिरसाठ,उत्तम पवार,विजय शिरसाठ अक्षय गागरे सुभाष पवार शरद शिरसाठ गणेश कल्हापुरे अनिल शिरसाठ दिलीप कल्हापुरे अजय कोकाटे विजय पवार आदी शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.

राहुरी तालुका मराठा एकीकरण समितीचे सदस्य व देसवंडी ग्रामस्थ उपस्थित राहत निषेध नोंदवला, परंतु या दरम्यान एक घोषणा देखील देण्यात आली नाही.बहुसंख्य पोलिस या ठिकाणी उपस्थित होते परंतु कोणतीही सूचना देण्याची गरज पोलिस प्रशासनाला पडली नाही. या दरम्यान पुन्हा मराठा क्रांती मोर्च्याची आठवण सर्वांना झाली.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!