श्रीगोंदा ( जनता आवाज वृत्तसेवा ):-श्रीगोंदा तालुक्यातील चांडगाव येथील रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये डॉ. पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची शिक्षकांसहित झांज पथकाने भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती.
विद्यार्थ्यांनी गावच्या चौका चौकात झांज पथकाचे विविध डाव साजर करून ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेत होते. या पथकामध्ये प्रत्यक्ष जामदार सर आणि ज्युनिअर कॉलेजचे खामकर सर यांना सुध्दा मोह आवरला नाही त्यांनी सुध्दा आपला सहभाग नोंदवित विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.यावेळी स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष, सदस्य,पालक,माता पालक संघ,गावचे सरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वच उपस्थितांचे स्वागत विद्यालयाचे प्राचार्य पोटरे सर यांनी केले शेवटी गावातील हलगी पथकाने कर्मवीर भाऊराव पाटील यांना मानवंदना दिली.यावेळी जरे सर, वाळुंज सर देखील उपस्थित होते.