टाकळीभान( जनता आवाज वृत्तसेवा):- टाकळीभान येथील गावचे माजी उपसरपंच तथा तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र कोकणे यांच्या संकल्पनेतुन, दैनिक सकाळचे पत्रकार स्व. बापूसाहेब कोकणे यांच्या स्मरणार्थ टाकळीभान येथील सर्व पञकारांना संरक्षण म्हणुन विमा कवच देण्यासाठी त्यांनी स्वखर्चाने येथील सर्व १४ पञकारांचा २ लाख रुपये अपघात विमा उतरवला आहे. यावेळी बोलताना कोकणे म्हणाले की गावाची निस्वार्थ भावनेने समाजसेवा करणाऱ्या पत्रकारांचे गावासाठी मोठे योगदान असून त्याचे काम जोखमीचे असून, कोरोणा काळातही पत्रकारांनी आपली कामगिरी जीव धोक्यात घालून चोखपणे बजावली आहे. त्यांना संरक्षण मिळावे व त्यांच्या कुटुंबांना आधार व्हावा हेतूने आपण विमा उतरविला असल्याचे ते म्हणाले म्हणाले. यामुळे १ वर्षासाठी पञकारांना संरक्षण मिळणार असले तरी पुढील प्रत्येक वर्षी पञकारांना हे विमा कवच देण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे.
निस्वार्थी भावनेने गावची सामाजिक सेवा करणाऱ्या पत्रकारांना विमा संरक्षण गरजेचे… राजेंद्र कोकणे. टाकळीभानचे माजी उपसरपंच राजेंद्र कोकणे यांनी उतरवीला गावातील सर्व पत्रकारांचा अपघाती विमा
नुकतेच विमा पाॕलिसीचे वितरण पञकारांना करण्यात आले.यावेळी राज्य महीला आयोगाच्या सदस्या मा.उत्कर्षाताई रुपवते याही उपस्थित होत्या. यावेळी प्रा कार्लस साठे सर यांनी सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले. यावेळी पत्रकार बांधवांच्या वतीने बापूसाहेब नवले व अर्जुन राऊत यांनी कोकणे यांचे आभार मानले व हार तुऱ्याच्या खर्चापेक्षा ही मौल्यवान भेट असल्याचे म्हटले. व इतर कार्यकर्ते, पदाधिकारी, संस्था यांनी कोकणे यांचा आदर्श घ्यावा असे पत्रकार म्हणाले. या उपक्रमासाठी बँक ऑफ महाराष्ट्राचे शाखाधिकारी रवींद्र तनपुरे साहेब यांनी सहकार्य केले.
यावेळी सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने राजेंद्र कोकणे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी टाकळीभान विकास आघाडीचे अध्यक्ष दादासाहेब कापसे, ज्येष्ठ ग्रामस्थ श्रीधर गाडे, प्रा.जयकर मगर सर,गजानन कोकणे, बंडोपंत बोडखे,सुरेश पवार, रामनाथ माळोदे,अमृत बोडखे, शरद रणनवरे,विष्णुपंत पटारे,सुबोध माने,नवनाथ पवार आदी सह सर्व पत्रकार, प्रेस फोटोग्राफर, पेपर विक्रेते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इतर संस्थांनी आपले कामगार, कर्मचारी,सभासद, मार्केट कमिटीने कर्मचारी, हमाल, यांचे विमे उतरवणे गरजेचे असून अचानकपणे काही अती प्रसंग ओढवल्यास त्या कुटुंबांना विम्याद्वारे मोठा आधार होत असल्याचे राजेंद्र कोकणे म्हणाले.



