लोणी दि.२४( जनता आवाज वृत्तसेवा ):-अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालय आणि पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सैनिक स्कूल लोणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा विखे पाटील सैनिक स्कूल येथे पार पडली.
स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री भरत गाढवे यांनी उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक केले. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या क्रीडा मार्गदर्शक सौ. बोडके यांनी आपले मनोगत व्यक्त करत खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील विविध शाळेतील तब्बल ३४० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेत सैनिक स्कूलच्या जलतरणपटूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून ४५ सुवर्णपदक १४ रौप्य पदक आणि६ कांस्यपदकाची लय लूट केली. यशस्वी खेळाडूंना विद्यालयाचे कमांडंट कर्नल शेखर जोशी मुख्याध्यापक भरत गाढवे यांनी अभिनंदन केले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी संस्थेचे क्रिडा संचालक डाॅ.प्रदिप विखे, क्रीडा संचालक प्रा. रमेश दळे, जलतरण प्रशिक्षक अखिल शेख, संतोष घोलप, प्रतीक दळे ,संदीप जाधव ,शकील पठाण, आजिनाथ चेचरे आणि संदीप इघे यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.




