लोणी दि.२४( जनता आवाज वृत्तसेवा ):-लोकनेते पद्यभुषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी महाविद्यालयामध्ये नुकतेच इंडो फार्मर्स क्लब या कंपनी च्या वतीने कॅम्पस ड्राईव्ह अंतर्गत कृषी सहाय्यक या पदासाठी मुलाखतींचे आयोजन करण्यात आले होते.
या मुलाखतीसाठी राहता, राहुरी, श्रीरामपूर, संगमनेर,कोपरगाव, सिन्नर, जामखेड, श्रीगोंदा या तालुक्यातील उमेदवार उपस्थित होते. इंडो फार्मर्स क्लब या कंपनीच्या वतीने कंपनीचे संचालक विजय मेहेर, कृषी सहाय्यक शैलेश साळवे तसेच प्रवरा कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयांच्या संचालिका डॉ शुभांगी साळोखे, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे ट्रेनिंग व प्लेसमेंट समन्वयक मनोज परजणे कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ किरण गोंटे, कृषि जैवतंञज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. विशाल केदारी,ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर डॉ. अनिल बेंद्रे,ट्रेनिंग व प्लेसमेंट समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. सुरुवातीला कंपनीच्या प्रतिनिधींचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयाच्या
प्राचार्य डॉ. शुभांगी साळोखे यांनी सर्वांचे स्वागत करून कृषी उत्पादक कंपनी शेतकऱ्यांच्या विकासासाठी कशी काम करते याबद्दल उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी इंडो फार्मर्स क्लब चे संचालक विजय मेहेर यांनी कंपनी बद्दल आणि कंपनीच्या कामकाजाबद्दल उमेदवारांना माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ. रमेश जाधव यांनी केले तर आभार डॉ अनिल बेंद्रे यांनी मानले. या मुलाखतीच्या माध्यमातून एकूण २४ उमेदवारांची निवड कंपनीमार्फत करण्यात आली. इंडो फार्मर्स क्लब या संस्थेसोबत कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयांचा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सामंजस्य करार देखील करण्यात आला.
निवड झालेल्या उमेदवारांचे कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. शुभांगी साळोखे, प्लेसमेंट विभागाचे समन्वयक प्रा मनोज परजणे, संस्थेचे अध्यक्ष व महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, संस्थेचे विश्वस्त आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकरी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे,शिक्षण संचालक डाॅ.प्रदिप दिघे यांनी अभिनंदन केले.




