लोणी दि.२४ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-लोकनेते पद्यभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील महाविद्यालय लोणी येथे दि. 22 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर 2023 रोजी विज्ञान महोत्सवाचे आयोजन केले होते.त्यामध्ये प्रवरा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. अशी माहिती शाळेचे प्राचार्य डॉ. बी.बी अंबाडे यांनी दिली.
संस्थेचे सहसचिव श्री.भारत घोगरे पा. व संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी संस्थेचे तांत्रिक संचालक डाॅ.प्रदीप दिघे, कोल्हार कॉलेजचे प्राचार्य डॉ. हरिभाऊ आहेर,राहाता कॉलेजचे प्राचार्य डॉ.सोमनाथ घोलप,प्राचार्य डॉ. राम पवार आदी उपस्थित होते.
दोन दिवस चाललेल्या या विज्ञान महोत्सवात परिसरातील एकूण ६३४ विद्यार्थ्यांनी आपल्या सहभाग नोंदवला. हा महोत्सव इयत्ता आठवी ते दहावी,अकरावी ते बारावी, व पदवी व पदव्युत्तर अशा तीन गटात आयोजित केला होता. या विज्ञान महोत्सवात प्रवरा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पारितोषिकांची अक्षरश: लूट केली.इयत्ता आठवी ते दहावी या गटात प्रवरा पब्लिक स्कूलचे दहावीचे विद्यार्थीं घुगे हर्षवर्धन व गांधले सिद्धार्थ यांच्या उपकरणास प्रथम क्रमांक मिळाला.तर दीक्षित वेदांत आणि जवकर सर्वेश,तसेच कु.आहेर वैभवी व कु.म्हस्के संस्कृती यांच्या उपकरणास द्वितीय क्रमांक मिळाला.उच्च माध्यमिक गटात कु.किर्तानी विधिता व कु.सोनवणे श्वेता यांनी प्रथम क्रमांक मिळवला व मोटे सार्थक व ताजणे रवीप्रज्ञा यांना ही प्रथम क्रमांक मिळाला.तसेच कु.पवार मुक्ता,कु. कु-हे गौरी यांनाही उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.अॅग्रीकल्चर गटातून इलांडेसरी श्रेयश,मिसाळ कृष्णा व कु.पोतदार सृष्टी यांच्या उपकरणास प्रथम क्रमांक मिळाला.तसेच आभाळे ऋषिकेश,कु.कोळसे साक्षी व गायकवाड माऊली यांच्या उपकरणास उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.प्रवरा पब्लिक स्कूलच्या एकूण १८ विद्यार्थ्यांना पारितोषिके मिळाली.
पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. यावेळी संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ,संस्थेचे तांत्रिक संचालक डॉ. प्रदीप दिघे, डॉ. महेश खर्डे,डाॅ.अनिल वाबळे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करून विजेत्या स्पर्धकांना सन्मानित करण्यात आले.
प्रवरा पब्लिक स्कूलने मिळवलेल्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील,संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुश्मिता विखे,संस्थेच्या शिक्षण संचालिका सौ.लीलावती सरोदे यांनी विजेत्या स्पर्धकांचे विशेष अभिनंदन केले.
प्रवरा पब्लिक स्कूलचे प्राचार्य डॉ. बी बी अंबाडे, उपप्राचार्य श्री.के टी अडसूळ,पर्यवेक्षिका सौ.एम एस जगधने,सौ.रत्नपारखी यांनीही विजेत्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.विज्ञान विषयाचे शिक्षक डी.डीअरंगळे,सौ.जोशी, व्ही.के शिंदे,वाय.एम दिघे,इलांडेसरी राजा यांचे विजेत्या विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन लाभले.




