spot_img
spot_img

नोकरी प्राप्त विद्यार्थ्याच्या पालकांचा अनोखा सन्मान; प्रवरेच्या चिंचोली अभियांञिकीचा उपक्रम केमिकल इंजिनिअरिंग विभागामध्ये ८६% कॅम्पस प्लेसमेंट

लोणी दि.२६ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सर विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी चिंचोलीच्या केमिकल इंजिनिअरिंग विभागातर्फे सिन्नर परिसरातील विविध गावांमध्ये जाऊन कॅम्पस प्लेसमेंट झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा अनोखा सत्कार करण्यात आला.
  मुलांच्या पंखात बळ देण्याचे काम शिक्षक आणि पालक यांच्याकडून होत असते.आपल्या मुलांसाठी केलेल्या कष्टाचे फळ पालकांसाठी महत्वपुर्ण असते.शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये केमिकल इंजिनिअरिंग विभागामध्ये ८६% कॅम्पस प्लेसमेंट झालेली असुन सर्व मुलांना विविध कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी महाविद्यालयाने उपलब्ध करून दिली आहे.विशेष म्हणजे बहुतांश विद्यार्थी हे शेतकरी सामान्य कुंटुंबातील आहेत.शिक्षणांतून ग्रामीण परिवर्तन हा हेतू कायमचं संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंञी ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचा राहीला आहे.कॅम्पस प्लेसमेंटसाठी त्यांची कायमचं आग्रही भुमिका असते.व्यवस्थापनेच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ. गणेश शिंदे, ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर प्रा. राजेंद्र बेलकर तसेच विभाग प्रमुख डॉ. दीपक चंद्रे यांनी संपूर्ण वर्षभर घेतले. आणि यातून अनेक नोकरी उपलब्ध झाली.हा आनंद
विविध गावातील ग्रामपंचायतींमध्ये सरपंचांच्या हस्ते सर्व पालकांचा सत्कार समारंभ अतिशय उत्साहात पार पडला.या मध्ये सिन्नर, वावी, सोमठाणे, गोंदे, ई. गावांचा समावेश होता.
    
या वेळी सर्व गावांचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच महाविद्यालयाच्या वतीने केमिकल अभियांत्रिकीचे विभाग प्रमुख डॉ. दीपक चंद्रे, डॉ. पोपट आव्हाड, डॉ. राहुल भंडारी, प्रा. राहुल पाटील व प्रा. सुशांत कुऱ्हे आदी मान्यवर उपस्थित होते.
नियुक्त झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष व महसूल मंत्री ना .राधाकृष्ण विखे पाटील ,जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील, खा. डाॅ.सुजय विखे पाटील,मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ.सुष्मिता विखे पाटील, यांनी अभिनंदन केले.
पालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा आमच्या सर्वांसाठी अतिशय सुखद व समाधानकारक क्षण होता.शिक्षणातून विद्यार्थी मोठा होतांना पालकांचे स्वप्न पुर्ण करतो.याचसाठी केला होता हट्ट असं अशीच प्रतिक्रिया उपस्थित शिक्षकांची होती.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!