सोनई-( जनता आवाज वृत्तसेवा ):-स्ञी स्पर्शू शकते आकाश,फक्त तीला संधी मिळण्याचा अवकाश या ब्रिद वाक्यानुसार देशात लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महिलांना 33 टक्के आरक्षण मिळाल्या बद्दल भाजपाच्या नगर महिला जिल्हाध्यक्षा अश्विनी थोरात यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
नुकताच देशाच्या संसदेत महिलांना लोकसभा व विधानसभा निवडणुकीत उभे राहण्यासाठी 33 टक्के आरक्षण देण्याचे विधेयक एकमताने मंजुर करण्यात आले.यानुसार देशात आता महिला खासदार व आमदारांची संख्या मोठया प्रमाणात वाढणार आहे.यामुळे महिला सबलीकरण व महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी हक्काच्या लोकप्रतिनिधी उपलब्ध होणार असुन सामाजिक व राजकिय क्षेञात काम करत असलेल्या महिला वर्गाला यामुळे मोठी संधी यामुळे मिळणार आहे.संसदेत महिला विधेयक बिल मंजुर झाल्या बद्दल नगर भाजपाच्या महिला जिल्हाध्यक्षा अश्विनी थोरात यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी मोठया जल्लोष व आनंद व्यक्त केला.यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष अश्विनी थोरात म्हणाल्या कि महिलाना यामुळे राजकारणात काम करण्यास मोठा वाव भेटणार आहे.तसेच महिलांचे विविध प्रश्न मांडण्यास हक्काची जागा उपलब्ध होणार आहे.आता सभागृहात महिला लोकप्रतिनिधीची संख्या वाढणार असुन आता लोकसभेला व विधानसभेला महिला आरक्षण पडले तर पक्षाच्या निष्ठावाण महिला पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मोठी संधी मिळणार असल्याच्या त्या म्हणाल्या.