spot_img
spot_img

सलाबतपुर येथे कर्मवीर जयंती निमित्त भव्य मिरवणूक

नेवासा फाटा( जनता आवाज वृत्तसेवा ): – नेवासा तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेचे, न्यू इंग्लिश स्कूल सलाबतपुर या ठिकाणी डॉ. पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 136 व्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली.

याप्रसंगी कर्मवीरांची प्रतिमा असलेल्या रथाचे पूजन ह. भ. प. निकम महाराज यांच्या हस्ते व स्कूल कमिटी सदस्य माननीय श्री सुनील भाऊ नजन, विद्यालयाचे माननीय मुख्याध्यापक श्री इटकर सर,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य माननीय श्री. विठ्ठल भाऊ पिसे , तसेच माननीय श्री. शंकर भाऊ वाघ , श्री असिफ भाई पटेल तसेच शिक्षक पालक संघ अध्यक्ष श्री.राहुल भाऊ डोळस व सर्व शिक्षक वृंद यांच्या उपस्थितीत करण्यात आले. मिरवणुकीचे खास आकर्षण कर्मवीर अण्णा व रयत माऊली लक्ष्मी वहिनी यांच्या वेशभूषेत असलेल्या विद्यार्थिनी ,लेझीम पथक टिपरी नृत्य ,कलश घेऊन विद्यार्थिनी व बालचमुचे वारकरी पथक इत्यादी होते. ही भव्य दिव्य मिरवणूक सलाबतपुर पंचक्रोशीत काढण्यात आली.

या मिरवणुकीसाठी विद्यालयाचे माननीय मुख्याध्यापक श्री इटकर सर यांनी मार्गदर्शन केले व रथ सजावटीचे कार्य आदरणीय श्री आहेर सर श्री लहिरे सर श्री चेमटे सर व वेशभूषा संकल्पना आदरणीय श्री कांबळे सर श्री शिंदे सर व श्री चौरे सर तर लेझीम पथकासाठी आदरणीय श्री पवार सर श्री बनकर सर श्री खराडे सर तर वारकरी पथक व कलश घेऊन विद्यार्थिनी याकरिता श्रीमती जमदाडे मॅडम श्रीमती नलावडे मॅडम श्रीमती राठोड मॅडम व श्रीमती विधाटे मॅडम आदींनी परिश्रम घेतले.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!