लोणी दि.२४( जनता आवाज वृत्तसेवा ):-स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन २०२३ च्या निमित्ताने मंगळवार दि.२६ सष्टेबर २०२३ रोजी प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय, लोणी येथे महसूल मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवरा रिसर्च इनोवेशन, स्टार्टअप अँड एमएसएमई च्या माध्यमातून नाविन्यपूर्ण परीक्षण करण्यात येत आहे. त्यादृष्टीने भविष्यकाळातील तंत्रज्ञान लक्षात घेऊन अभियांत्रिकीच्या विविध विभागातील विद्यार्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत दिला. अशी माहिती प्राचार्य संजय गुल्हाणे यांनी दिली.
स्मार्ट इंडिया हॅकथॉन २०२३ ही स्पर्धा ए.आय.सी.टी.ई. आणि मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, भारत सरकार यांच्या संयोजनाने राष्ट्रीय पातळीवर होत आहे . या स्पर्धेसाठी महाविद्यालयातील वरील विविध विभागातील ग्रुप्स सहभागी होत आहेत. त्यातून ३० ग्रुप्स ची निवड करण्यात येणार आहे. यामध्ये स्मार्ट ऑटोमेशन, स्मार्ट व्हेईकल, स्मार्ट एज्युकेशन, रोबोटिक्स अँड ड्रोन, रिन्यूएबल एनर्जि, सायबर सेक्युर्टी, डिझास्टर मॅनेजमेंट, बायो-टेक, क्लीन अँड ग्रीन टेक्नॉलजी, फिटनेस अँड स्पोर्ट्स, अॅग्रिकल्चर, इत्यादी रिसेन्ट ट्रेंड्स वर विविध टेक्निकल आयडिया चे परीक्षण समन्वयक आणि आय.आय.सी. चे अध्यक्ष डॉ. संजय कुरकुटे तसेच डॉ. बी. ल. पांगारकर, प्रा. सुभाष मगर, प्रा. सुहास काळे, प्रा. राजेश भांबारे, सर्व विभाग प्रमुख आणि सर्व विभागाचे प्रोजेक्ट को-ओरडीनेटेर्स यांच्या उत्कृष्ट व तज्ञ मार्गदर्शनाखाली होत आहे. या स्पर्धेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने व सर्व विभागप्रमुख यांचे मार्गदर्शन व विशेष सहकार्य मिळत आहे. स्पर्धेसाठी सर्व आय.आय.सी. टीम याबाबत सर्व आयोजन करण्यासाठी परिश्रम घेत आहे. त्यामधील निवडलेले ३० ग्रुप्स हे स्मार्ट इंडिया हॅकथॉन २०२३ या स्पर्धेसाठी पाठवण्यात येणार आहेत.