संगमनेर (जनता आवाज वृत्तसेवा):- संगमनेर पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. पोल्ट्री व्यवसायासाठी राज्य सरकारने विविध योजनेची अंमलबजावणी करण्यात प्रारंभ केला असून पोल्ट्री व्यवसायिकांना दिलासा देण्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विविध योजनेचे निर्णय करून अंमलबजावणी सुरू केली आहे.
पोल्ट्री व्यवसायासाठी राबविण्यात येणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्प हा व्यवसाय दृष्टीने मोठा जिल्हा सदा एक ठरेल असा विश्वास राज्यस्तरीय कुकुट समन्वय समिती सदस्य श्री धनंजय आहेर यांनी व्यक्त केला.
यावेळी अहमदनगर जिल्हा परिषद पशुसंवर्धन उपआयुक्त मा. डॉ. तुंबारे साहेब व राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समितीचे सदस्य मा.धनंजय आहेर साहेब, मा. एकनाथ शेठ मुंगसे , मा. सुदर्शन पोकळे साहेब आणि पंचायत समिती संगमनेर पशुसंवर्धन विभागातील डॉ. येवले साहेब, डॉ. जोधळे साहेब कंपनी प्रतिनिधी व संगमनेर तालुक्यातील व अहमदनगर जिल्ह्यातील बाँयलर , लेअर, अंडे, गावरान, पोल्ट्री असे एकुण ३०० पोल्ट्री व्यावसायिक उपस्थित होते.
डॉ. तुंबारे साहेब, आयुक्त पशुसंवर्धन विभाग अहमदनगर यांनी अनमोल मार्गदर्शन करुन समन्वय समितीच्या सदस्यांनी पोल्ट्री व्यावसायिकाचे प्रश्न ऐकुन घेत शासन दरबारी मांडण्याची दखल घेत. समाधान व्यक्त केले.
यावेळी प्रास्ताविक मा. आहेर साहेब यांनी केले डॉ तुंबारे साहेब, मा. धनंजय आहेर,मा. एकनाथ शेठ मुंगसे, मा. सुदर्शन पोकळे व उपस्थित पशुसंवर्धन च्या अधिकारी वर्गाने मार्गदर्शन केले.
1. पोल्ट्रीधारकांसाठी शासनामार्फत सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्यात येणार असून, त्यासाठी शासनामार्फत पोल्ट्रीधारकांची संख्या व त्यांचा तपशील यांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू केले आहे. दरम्यान, शासनाच्या माध्यमातून सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्यासाठी सर्व पोल्ट्री शेडची माहिती संकलित करण्याचे आव्हान सर्व पोल्ट्री धारकांना केले.
2. पोल्ट्री धारकांनी आपल्या फार्मची नोंद जवळच्या पशू वैद्यकीय दवाखाना, पंचायत समिती किंवा जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयात त्वरित करून घ्यावी इथून पुढे कुठल्याही लाभ घेण्यासाठी ही नोंद आवश्यक असणार आहे.
3. कुक्कुट कंपन्यांच्या खाद्य गुणवत्तेबाबत..!
4. ग्रामपंचायतीच्यावतीने पोल्ट्रीधारकांना करपट्टी भरणा करण्यासाठी न्यायालयामार्फत नोटीस पाठवत असतात. शेतीपूरक
व्यवसायाला करपट्टीही नसावी, याबाबतचा पाठपुरवठा पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील स्वतः करत आहेत. त्यामुळे चुकीच्या व अवास्तव रकमेच्या करपट्टी भरण्यास या सभेत पोल्ट्रीधारकांनी एकमताने विरोध केला. अलीकडेच हायकोर्टाने जाहीर केले की पोल्ट्री हा शेतीपूरक व्यवसाय असून ग्रामपंचायत कर वसूल करण्याचा अधिकार नाही.
5. शासनाच्या आदेशानुसार पोल्ट्रीसाठी वापरण्यात येणारे वजन काटे प्रमाणित करून घेण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती कुक्कुट समितीने दिली.
तसेच मा ना राधाकृष्ण विखे पाटील साहेब, मंत्री महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखामुळे राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समिती पोल्ट्री व्यवसायासाठी चांगल्या प्रकारे काम करत आहे.
या शासकिय कार्य शाळेसाठी प्रशासकीयअधिकारी पोल्ट्री व्यावसायिक उपस्थित राहिल्या बद्दल आभार राजेंद्र कहांडळ यानी मानले.