spot_img
spot_img

जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत विखे पाटील सैनिक स्कूल अजिक्य

लोणी दि.२६( जनता आवाज वृत्तसेवा):-लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पद्यश्री डाॅ.विखे पाटील सैनिक स्कूल लोणी येथे संपन्न झालेल्या १४ वर्षाखालील जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत विखे पाटील सैनिक स्कूलने गौतम पब्लिक स्कूलचा २-० ने पराभव करीत प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत जिल्ह्यातून वीस संघानी सहभाग नोंदवला होता. त्यात प्रथम क्रमांक पद्यश्री डाॅ विखे पाटील सैनिक स्कूल लोणी, द्वितीय क्रमांक गौतम पब्लिक स्कूल कोळपेवाडी व तृतीय क्रमांक संजीवनी सैनिक स्कूल कोपरगाव या संघांनी प्राप्त केला.
   

विजय संघाचे संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंञी ना.राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे
पाटील,खा.डाॅ.सुजय विखे पाटील,सह सचिव भारत घोगरे,अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ.शिवानंद हिरेमठ,शिक्षण संचालिका सौ.लिलावती सरोदे,संस्थेचे क्रीडा संचालक डाॅ.प्रमोद विखे,कर्नल शेखर जोशी ,प्राचार्य भरत गाढवे स क्रीडा संचालक श्री रमेश दळे यांनी अभिनंदन केले.स्पर्धा यशस्वी होण्यासाठी क्रीडाशिक्षक प्रतीक दळे,रविंद्र भणगे यांनी पंच म्हणून काम पाहिले.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!