6.2 C
New York
Friday, November 29, 2024

Buy now

spot_img
spot_img

राहुरी तालुक्यातील ३२ गावाला विकासापांसुन वचिंत ठेवणाऱ्या आमदार लहु कानडे यांना भाजपावर टिका करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही – सागर भांड पा.

राहुरी (जनता आवाज वृत्तसेवा):- राहुरी तालुक्यातील 32  गावाला विकासापांसुन वचिंत ठेवणाऱ्या आमदार लहु कानडे यांना भाजपावर टिका करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही – सागर भांड पा.

आमदार लहु कानडे यांनी राहुरी तालुक्यातील मुसळवाडी येथे जनसंवाद यात्रेत भाजपा जातीपातीचे राजकारण करत आहे असा आरोप केला हा आरोप म्हणजे तोंडातून जे येईल बोलायाचे व जनतेमधे संभ्रम निर्माण करायाचा , असा असुन जातीपातीचे काँगेस सरकारने केले असून म्हणून जनतेने त्यांना घरी बसविले आहे असे भाजपाचे 32 गावातील युवा कायॅकतेॅ , भाजपाचे पदवीधर प्रकोष्ठचे उत्तर नगर जिल्हा संयोजक सागर भांड पाटील यांनी म्हटले आहे.

आमदार कानडे म्हणतात की भाजपाने नागरीकांना खोटी आश्वासने दिली आहे हा आरोप बिनबुडाचा असुन. आमदार कानडे किती खोटी आश्वासने देउन मते मागितली होती आणि किती विकास केला याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. जनसंवाद यात्रा म्हणजे जनतेमध्ये जाणे त्यांचे प्रश्न सोडविणे यासाठी असते परंतु आमदार समाज्यात चुकीची वक्तव्ये करून लोकांची दिशाभूल करत आहे

राहुरी तालुक्यातील 32 गावाला विकासापांसुन वचिंत ठेवणाऱ्या आमदार लहु कानडे यांनी खोटे आरोप करून जनतेची दिशाभूल करु नये असा भाजपाचे 32 गावातील युवा कार्यकर्ते तथा भाजपा पदवीधर प्कोष्ठ चे उत्तर नगर जिल्हा संयोजक सागर भांड पाटील यांनी प्रसिद्धी  पत्रकात म्हटले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!