spot_img
spot_img

प्रवरेच्या औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयातील राष्ट्रीय पातळीवरील एम. फार्मसी अभ्यासक्रमच्या नायपर परीक्षेत आठ विद्यार्थ्याची निवड

लोणी दि.२६ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-देशातील राष्ट्रीय पातळीवरील एम. फार्मसी अभ्यासक्रमच्या प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत २०२३ या वर्षी घेण्यात आलेल्या नायपर परीक्षेत लोणी येथील लोकनेते पद्मभूषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे प्रवरा ग्रामीण औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयातील आठ विद्यार्थ्यांनी यश संपादित केले अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय भवर यांनी दिली.
    

 महाविद्यालयातील चतुर्थ वर्ष पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थी श्रीराम बांगर, आदित्य पंधारे ,आदित्य ह्याळीज, संकेत गाडेकर, मनीषा जाधव, अस्मिता बिनगे इत्यादी विद्यार्थ्यांनी परीक्षेत घवघवी यश संपादित केले. महाविद्यालयात स्वतंत्र ट्रेनिंग व प्लेसमेंट कक्ष असून त्यामार्फत विविध सेमिनार, वर्कशॉप चे आयोजन करण्यात आले होते त्यांचा फायदा या विद्यार्थ्यांना झाला.
 यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील, सहसचिव श्री. भारत घोगरे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ शिवानंद हिरेमठ, महाविद्यालयाचे संचालक डॉ. बी. एम. पाटील,प्राचार्य डॉ संजय भवर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!