spot_img
spot_img

टाकळीभान विविध कार्यकारी सोसायटीची २९ सप्टेंबर रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा

टाकळीभान, ( जनता आवाज वृत्तसेवा ):- श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान विविध कार्यकारी सह.(विकास) सेवा संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक २९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता संस्थेच्या सभागृहात संस्थेचे विद्यमान प्राधिकृत अधिकारी एस.पी. रुद्राक्ष सहाय्यक निबंधक सहकारी संस्था श्रीरामपूर यांचे अध्यक्षतेखाली खालील विषयांचा विचार विनिमय करणेसाठी आयोजित करण्यात आली असून सदर सभेस सर्व सभासद बंधू व भगिनींनी उपस्थित रहावे असे आवाहान संस्थेचे सचिव रामनाथ सिताराम ब्राम्हणे यांनी केले आहे.

यावेळी नियोजित अध्यक्ष यांना अध्यक्षस्थान स्विकारणेबाबत विनंती करणे, मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे प्रोसिडींग वाचून मंजुर करणे, सन २०२२-२०२३ सालची वार्षिक हिशोबाची पत्रके तेरीज, ताळेबंद, नफातोटा पत्रक वाचुन मंजुर करणे, सन २०२३ २०२४ सालाकरीता सभासदांचे अल्पमुदत, मध्यममुदत व दिर्घमुदत व इतर कर्जाची कर्ज क.म. पत्रके फिक्स लोन, कॅश क्रेडीट प्रकरणे तयार करुन बँकेकडे मंजुरीसाठी पाठविणे बाबात, सन २०२३ २०२४ या वर्षाकरीता उत्पन्न व खार्चाचे अंदाजपत्रकास मंजूरी देणे, सभासदांकडील थकबाकी वसुलीबाबद विचार करणे अध्यक्षांच्या पूर्व परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयांचा विचार करणे आदी विषयांवर या सभेत चर्चा करण्यात येणार आहे.

वार्षिक सर्वसाधारण समेत वैयक्तीक तक्रारींचा तसेच विषय पत्रिकेव्यतीरीक्त इतर विषयांचा विचार केला जाणार नाही, ज्या सभासदांना सदर सभेत काही प्रश्न अगर खुलासा विचारावयाचा असेल तर त्यांनी सदर प्रश्नांचा स्पष्ट अर्थ लागेल अशी रुपरेषा संस्थेच्या सचिवाकडे दि. २६/०९/२०२३ पूर्वी संस्थेच्या कार्यालयीन वेळेत लेखी रुपात द्यावी तसे न झाल्यास माहिती अभावी समाधानकारक उत्तरे अगर खुलासा करता येणार नाही.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!