14.9 C
New York
Monday, September 8, 2025

Buy now

spot_img
spot_img

नेवासा येथे १७४ बचत गटांना सौ.सुनीताताई गडाख यांच्या हस्ते तीन कोटी ५८ लाख ५८ हजार रुपयांच्या कर्जाचे वाटप उत्कर्षासाठी बचत गटांच्या महिला सदस्यांनी स्व:तला अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करावा-सौ.सुनीताताई गडाख

नेवासा( जनता आवाज वृत्तसेवा ):- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद)अंतर्गत आमदार शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा तालुक्यातील १७४ महिला बचत गटांना बचत गटाच्या मार्गदर्शक सौ.सुनीताताई गडाख यांच्या हस्ते तीन कोटी ५८ लाख ५८ हजार रुपयांच्या कर्जाचे वाटप धनादेश देऊन करण्यात आले.संगणकीय ज्ञानाचा वापर करून व्यवहाराची उलाढाल करतांनाच बचत गटांच्या महिला सदस्यांनी स्व:तला अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन सौ.सुनीताताई गडाख यांनी यावेळी बोलताना केले.

नेवासा येथील श्री लक्ष्मी मंगलकार्यालयात तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती नेवासा महिला स्वयंसहायता समूहांना आमदार शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य बँक लोन मेळाव्यात सदरच्या कर्जाचे वितरण करण्यात आले.

यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.सुनीताताई शंकरराव गडाख हया होत्या तर नेवासा पंचायत समितीचे माजी सभापती रावसाहेब कांगुणे,गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर, माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब सोनवणे, नगराध्यक्ष सौ.योगिता सतीश पिंपळे,सतीश पिंपळे,अरुण शिंदे,गणेश भोरे,तालुका विकास अधिकारी खाटीक, एचडीएफसी बँकेचे काळे,नोडलचे हारदे,प्रबंधक अजय गोरे,बडोदा बँकेचे अतुल शिर्के,नगरसेविका सविता कु-हे,सौ.आशाताई वाखुरे,पंचायत समितीचे माजी सदस्य रविंद्र शेरकर,कैलास झगरे,जिल्हा अभियान व्यवस्थापक सोमनाथ जगताप,प्रबंधक सतीश खडीझोरे,अरुण शिरसाठ,तालुका अभियान व्यवस्थापक कक्ष प्रमुख अर्जुन सोनवणे,जयदीप शेळके,स्टेस्ट बँकेचे प्रविण हासे यांच्यासह विविध बँकेचे प्रतिनिधी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी बोलताना सौ. सुनीताताई गडाख म्हणाल्या की सद्या संगणकीय युगात महिला बचत गटांच्या सदस्यांनी व्यवहार ज्ञान वाढविले पाहिजे कोणावर ही विसंबून न रहाता संगणकीय ज्ञानाचा वापर दैनंदिन जीवनात सर्वांना करायचा आहे,फोन पे गुगल पे सारखे व्यवहार हे तेजीने अंमलात आणले पाहिजे बचत गटांच्या उत्कर्षासाठी आमदार गडाख साहेब कायम आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे त्याची काळजी करू नका,जिद्द व चिकाटीच्या जोरावर बचत गटांच्या माध्यमातून जीवनात उत्कर्ष करा,सगळ्यांनी स्व:तला अपडेट ठेवा,स्व:त अपडेट रहा,माझ्या शुभेच्छा ही तुमच्या सर्वांच्या पाठिशी आहे अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी बोलताना दिल्या.

या मेळाव्याच्या प्रसंगी श्रीमती ऐश्वर्या देशमुख,विलास राठोड,केशव गायकवाड,नितीन पंडित,दत्तू शिरसाठ,सुजाता कीर्ती शाही, मीनाताई कदम,यावेळेस उपस्थित होत्या.

या कार्यक्रमाच्या प्रसंगी बँक ऑफ बडोदा-शाखा प्रवरासंगम श्रीरामपूर सलबतपुर भेंडा-मार्फत बचत गटांना दीड कोटी चेकचे वितरण करण्यात आले, एचडीएफसी बँक सोनई ५३ लाख १७हजार, युको बँक शनिशिंगणापूर ३६ लक्ष, एसबीआय बँक सोनई ५४ लाख ५० हजार, ए डी सी सी बँक नेवासा मार्केट यार्ड ३५ लक्ष, बँक ऑफ बडोदा भेंडा १५ लक्ष, बँक ऑफ महाराष्ट्र कुकाणा १५ लक्ष असे एकूण १७४ बचत गटांना ३ कोटी ५८ लाख ५८ हजार रुपयाचे कर्ज वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी नेवासा तालुक्यातील बचत गटाच्या महिला सदस्य हजारोंच्या संख्येने उपस्थित होत्या एक स्त्री शक्तीच्या कार्य कर्तृत्वाचे दर्शन त्यानिमित्ताने झाले.यावेळी उपस्थित बचत गटाच्या महिलांना अल्पोपहार देण्यात आला.अनेकांना आमदार शंकरराव गडाख यांच्या कट आउट जवळ ग्रुपने फोटो घेतला तर काहींनी सजविलेल्या सायकल रथावर बसून फोटो घेतले हे चित्र व महिलांचा उत्साह यावेळी दिसून येत होता .

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!