33.2 C
New York
Wednesday, June 25, 2025

Buy now

spot_img
spot_img

अ.भा.मराठा महासंघाची वार्षिक सभा व मेळावा ३० सप्टेंबर रोजी शिर्डी येथे होणार मराठा समाजातील युवा उद्योजक, शेतकरी, विद्यार्थी व महिला भगिणींनी उपस्थित राहण्याचे आवाहन

शिर्डी( जनता आवाज वृत्तसेवा ):-अखिल भारतीय मराठा महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा, युवा उद्योजक, शेतकरी व विद्यार्थ्यांकरिता मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन शनिवार, दि. ३० सप्टेंबर रोजी शिर्डी येथील सप्तपदी लॉन्स येथे करण्यात आले असून या मेळाव्यासाठी मराठा समाजबांधव व महासंघाच्या पदाधिकार्‍यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नगर जिल्हा मराठा महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे. 

अखिल भारतीय मराठा महासंघाचे २०२३ ची वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे तर मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ना. नरेंद्र पाटील हे उपस्थित राहणार आहेत.

या सभेसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व सारथी संस्थेच्या विविध योजनांचा युवा उद्योजक, शेतकरी व विद्यार्थी मार्गदर्शन मेळावा होईल. तसेच जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा मराठा भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल तसेच नवीन पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात येणार आहे. कार्यक्रमसाठी राष्ट्रीय सरचिटणीस प्रकाश देशमुख, उपाध्यक्ष विनायक पवार, वसंतराव मुळीक, प्रमोद जाधव, आतिष गायकवाड, गुलाब गायकवाड यांच्यासह विभागीय पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने मराठा समाजातील युवा उद्योजक, शेतकरी, विद्यार्थी व महिला भगिणींनी उपस्थित राहण्याचे आवाहन उत्तर जिल्हाध्यक्ष प्रकाश निर्मळ, दक्षिण जिल्हाध्यक्ष शिवाजी डौले, सरचिटणीस रमेश बोरूडे, तालुका अध्यक्ष दिनकर पवार, युवा जिल्हाध्यक्ष ओम काळे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख भाऊसाहेब वाकचौरे आदींसह जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांनी केले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!