नाशिक दि.२७ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-सर विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी देखील “प्रवरेचा राजा” अशी ख्यातनाम कीर्ती असलेले बाप्पा सगळ्यांच्या भेटीसाठी आले. बाप्पांच्या सुंदर अशा प्रतिकृतीची स्थापना यावर्षी देखील करून महाआरती आणि महाप्रसाद याचं आयोजन करण्यात आले.या आनंदाच्या क्षणी महाविद्यालयांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी.बी. शिंदे यांनी केले. विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करुन स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी त्यांनी उत्तेजन दिले. या सांस्कृतिक महोत्सवांमध्ये तसेच विद्यार्थ्यांच्या खास कलागुणांना वाव मिळावा म्हणून खास विविधधांगी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .यामध्ये पोस्टर प्रेसेंटेशन, हॅकॅथॉन, नृत्य, क्रीडा , रांगोळी यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांच्या अंगीभुत कला गुणांना योग्य व्यासपीठ मिळावं तसेच भविष्यामध्ये त्यांच्या कलागुनाचा यथासांगपणे वापर करून व्यक्तिमत्व विकास व्हावा असा या स्पर्धेमागे उद्दिष्ट होता व त्याचा प्रत्यय विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये भाग घेऊन दाखवला. स्पर्धेच्या बक्षिसाचे वितरण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुष्मिता विखे यांच्या हस्ते करण्यात आले. गणेशोत्सव आणि सांस्कृतिक महोत्सव यशस्वीपणे पार पाडावा यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य जी.बी. शिंदे, प्रा. दत्तात्रय घोगरे,प्रा वनिता सानप, प्रा. खर्डे, डॉ. बाळासाहेब घुले,फार्मसीचे प्राचार्य डाॅ.विजय तांबे, प्राचार्या डाॅ.चारुशीला भंगाळे, डॉ. दीपक चंद्रे, डॉ. महाजन राणा, डॉ. राहुल भंडारी, डॉ.सचिन बोरसे ,डॉ.चंद्रा रॉय व इतर मान्यवर आणि विद्यार्थी वर्गाने विशेष अथक प्रयत्न घेतले .